AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाठलाग करायचा, गुपचूप फोटो काढायचा आणि स्वत:च्या फोटोशी… फोन जप्त करताच पोलिस हादरले

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक अजब आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. एका युवकाने एआयचा वापर करुन भयानक कांड केले. जेव्हा त्याचा फोन जप्त केला तेव्हा त्याच्या फोनमधील डेटा पाहून पोलिसही हादरले.

पाठलाग करायचा, गुपचूप फोटो काढायचा आणि स्वत:च्या फोटोशी... फोन जप्त करताच पोलिस हादरले
सांकेतिक फोटोImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 09, 2026 | 2:10 PM
Share

दिवसेंदिवस एआय तंत्रज्ञानाचा (आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा) वापर वाढत चालला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे अनेक गोष्टी करणे सोप झाले आहे. एखादा फोटो एडीत करण्यासाठी तर आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा मोठा फायदा होत आहे. पण नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसेच एखाद्या तंत्रज्ञानाच्या फायद्यांसोबत तोटे देखील असतात. एआयचे जसे चांगले फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. याचाच पुरावा देणारी घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक अजब आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. एका अविवाहित युवकाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करत महिलेच्या फोटोसोबत स्वतःचा फोटो जोडला आणि तिचा सतत पाठलाग सुरू ठेवला. या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपासात आरोपीच्या मोबाइलमधून ५०हून अधिक महिला व मुलींचे गुपचूप काढलेले फोटो सापडले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसात तक्रार दाखल

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी गेला काही काळ तिचा सतत पाठलाग करत होता. त्याने तिचे फोटोही काढले होते. या त्रासाला कंटाळून महिलेने केज पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

तपासात आरोपीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करत महिलेच्या फोटोसोबत स्वतःचा फोटो जोडला असल्याचे समोर आले. तसेच त्याच्या मोबाइलमधून ५०हून अधिक महिला व मुलींचे छुप्या पद्धतीने काढलेले फोटो जप्त करण्यात आले. आरोपी गुपचूप महिला आणि मुलींचे फोटो काढून त्यांचा पाठलाग करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा