माझ्या विजयाचं श्रेय मनोज जरांगेंचं…; बीडच्या जाहीर सभेत बजरंग सोनावणेंचं विधान

Bajrang Sonawane on Manoj Jarange Patil : खासदार बजरंग सोनवणे हे आज बीडमध्ये आहेत. यावेळी ठिकठिकाणी बजरंग सोनवणे यांचा नागरी सत्कार केला जात आहे. यावेळी बीड लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीतील विजयावर बजरंग सोनवणे यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

माझ्या विजयाचं श्रेय मनोज जरांगेंचं...; बीडच्या जाहीर सभेत बजरंग सोनावणेंचं विधान
बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 6:07 PM

राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ. पंकजा मुंडे विरूद्ध बजरंग सोनवणे अशा झालेल्या या लढतीत बजरंग सोनवणे विजयी झाले. या विजयानंतर पहिल्यांदाच खासदार बजरंग सोनवणे यांचा जाहीर नागरी सत्कार होत आहे. बीडच्या केजमध्ये बजरंग सोनवणे यांचा सत्कार केला जात आहे जेसीबीने फुलांची उधळण करत बीडकरांनी बजरंग सोनवणे यांचं स्वागत केलं. यावेळी बजरंग सोनवणे यांनी बीडच्या विजयावर महत्वाचं विधान केलं आहे. माझ्या विजयाचे श्रेय शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील यांनी देत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मला काय द्यायचे ते दिलं आहे, असं बजरंग सोनवणे म्हणालेत.

त्या पोस्टरचं प्रकाशन

मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या पोस्टरचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून प्रकाशन करण्यात आलं. 11 तारखेला बीड शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या पोस्टरचं खासदार सोनावणे यांनी प्रकाशन केलं. 11 तारखेला जिल्ह्यातील सर्वच मराठा बांधवांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन?

बीड जिल्ह्यातील सहाच्या सहा उमेदवार विधानसभेला निवडून द्या, असं मी तुम्हाला आवाहन करतो. केज विधानसभा मतदार संघातील आमदार आपलाच होईल. अधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडे जे विभाग आहे, तेच काम करावं. मी खासदार झालोच कसा हे दुखणं अनेकांना समजून येतच नाही. मलाही एक महिना मी खासदार झाल्याचं समजलं नाही. मी सतत बायकोला विचारायचो की मी खरच खासदार झालो का?, असं बजरंग सोनवणे या सभेत म्हणाले.

लोकसभा संपली आता जाऊ द्या की… मी पाच वर्ष खुर्चीला खुर्चीला लावून बसणारच आहे. मी खासदार झालोय हे आतातरी मान्य करा. खासदार काय असतो हे मी बीड जिल्ह्याच्या लोकांना कामाच्या माध्यमातून दाखवून देणार आहे. राज्यात सरकार आपलं येणार आहे. आता इच्छुकांची गर्दी वाढली आहे. दोन महिन्यात आचार संहिता लागणार आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा, अशा सूचना बजरंग सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

नागरिकांना काय शब्द दिला?

बजरंग सोनावणे याला तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न झाले. कामाचे श्रेय वाद घेऊ नका पण आधी बीडचा विकास करा. कोणीही उठतं आणि ऊसतोड मजुरांचा नेता म्हणून पुढे येतो. जिल्ह्याला सधन करण्याचे स्वप्न पाहा… पालकमंत्री मुंडे म्हणाले मी कन्फ्युज करतो. पण मी दिलेले वचन पूर्णपणे निभावणार आहे. रात्री अपरात्री कधीही फोन करा, रुग्णांसाठी माझे दोन्ही फोन चालूच असतील. मी पक्षपात करणार नाही, असा शब्द बजरंग सोनवणे यांनी बीडकरांना दिला.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.