बीडमध्ये महिलेची छेड काढत व्हिडीओ काढला, संतप्त जमावाने दोघांना बेदम चोपला! लाथाबुक्क्यांनी तुडवलं

बीडमध्ये महिलेची छेड काढत व्हिडीओ काढला, संतप्त जमावाने दोघांना बेदम चोपला! लाथाबुक्क्यांनी तुडवलं
बीडमध्ये मारहाण
Image Credit source: TV9 Marathi

Beed Crime Fight Video : गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

संभाजी मुंडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 19, 2022 | 10:54 AM

बीड : बीडमध्ये (Beed Crime) एका महिलेची छेड काढत व्हिडीओ (Crime Video) काढला जात होता. ही बाब लक्षात आल्यानंतर व्हिडीओ काढणाऱ्या दोघा संशयितांना जमावानं बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्यात आलेल्यांना जबर जखम झाली असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर महिला पाण्यासाठी गेली होती. त्यावेळी या महिलेची छेड काढण्यात आली. छेड काढत व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं होतं. यामुळे जमावानं दोघा जणांना चोप (two beaten by mob in Beed) दिलाय. लाथाबुक्क्यांनी छेड काढणाऱ्यांना जमावाकडून तुडवण्यात आलं. यावेळी मोठा गोंधळ झाला होता. एकाच गोंधळ आणि आरडाओरडा यावेळी बघायला मिळाला. ही संपूर्ण घटना जमावापैकी एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

बीड तालुक्यातल्या कामखेडा गावातली ही घटना असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी अद्यात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र तुफान बाचाबाचीनंतर जोरदार राडा या गावात झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय.

पाहा व्हिडीओ :

गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. दरम्यान, आता समोर आल्या घटनेमध्ये जमाव एका ठिकाणी गोळा झाल्याचं दिसतंय. यावेळी एक महिला पुरुषाला हटकते. त्यानंतर हा पुरुष तिच्यावरच उलट हल्ला केला. पुरुषानं केलेला हल्ला पाहून जमावाला संताप अनावर होतो.

हे सुद्धा वाचा

संपूर्ण जमाव महिलेवर हल्ला करणाऱ्याच्या दिशेने धावून जातो. या पुरुषाला जमिनीवर पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात येतं. आरडाओरडा आणि मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी लहान मुलंही होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या संपूर्ण घटनेप्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें