Beed | जडीबुटी विकणाऱ्याकडे आढळले साडे 13 लाख रुपये, पोत्यात कोंबल्या होत्या नोटा, धारूरच्या उमराई वसतीतला प्रकार!

हा मुखिया जडीबुटीचा व्यवसाय करतो तर त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, एवढ्या दिवसांपासून यांच्यावर कुणाचा संशय कसा गेला नाही, असे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत.

Beed | जडीबुटी विकणाऱ्याकडे आढळले साडे 13 लाख रुपये, पोत्यात कोंबल्या होत्या नोटा, धारूरच्या उमराई वसतीतला प्रकार!
सांकेतिक छायाचित्र Image Credit source:
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 2:55 PM

बीड | जिल्ह्यातील केज-आडस रस्त्यावरील उमराईपासून दोन किमी अंतरावरील एका वसतीवर पोलिसांनी (Beed police) टाकलेल्या धाडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील परप्रांतिय वसतीवरील जडीबुटी विक्रेत्याकडे तब्बल साडे 13 लाख रुपयांची रक्कम आढळली. विशेष म्हणजे एवढ्या रकमेच्या नोटा पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत होत्या. गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी पहाटे पोलिसांनी (Police Raid) येथील वसतीला पहाटे चार वाजेच्या सुमारास वेढा टाकला. येथे राजस्थानातून आलेली अनेक कुटुंब राहतात. या वस्तीवरील सर्वांचा प्रमुख असलेला व जडीबुटी विक्रेता अर्जुन सोळुंके यांच्या घरात एका पोत्यात 13 लाख 21 हजार 320 रुपये आढळले. ही रक्कम पोलीसांनी जप्त केली असून गुन्हेगारीशी (Beed crime) याचा काही संबंध आहे का, याचा तपास सुरु आहे.

म्होरक्याकडे पोत्यात कोंबल्या होत्या नोटा

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, धारूर येथील वसतीवरील काही लोक संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे पथक व धारूर पोलिसांच्या पथकातील 50 पेक्षा जास्त पोलीसांनी गुरुवारी पहाटे चार वाजता उमराई वसतीला वेढा घातला. यात अर्जुन सोळंकेच्या पालात पोत्यात 13 लाख 21 हजार 320 रुपये आढळले. अंबाजोगाई तालुक्यातील केज आडस रोडवरील उमराईपासून पश्चिमेस दोन किमी अंतरावरील वस्तीवर काही लोक पालं ठोकून राहतात. यातील काही जण चटई विक्रीचा व्यवसाय करतात. येथे अर्जून हा प्रमुख आहे. जडीबुटीचा व्यवसाय करण्यास तो जवळच उभारलेल्या देवीच्या मंदिरात पुजारी म्हणूनही काम करतो. त्याच्याकडे सापडलेली रक्कम धारूर पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी तपास सुरु आहे.

म्होरक्या अर्जुन सोळंकेच्या कुटुंबियांचीही चौकशी

ज्याच्याकडे 13 लाख रुपये आढळले, त्या अर्जुन सोळंके याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला धारूर पोलीस ठाण्यात आणले आहे. त्याच्यासोबतच कुटुंबातील अन्य चौघांची चौकशी सुरु आहे. हा मुखिया जडीबुटीचा व्यवसाय करतो तर त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, एवढ्या दिवसांपासून यांच्यावर कुणाचा संशय कसा गेला नाही, असे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत.

इतर बातम्या-

Road Rage CCTV | स्कूटीस्वार चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबीय म्हणतात अपघात नाही, बाईकवाल्याच्या मारहाणीत जीव गेला

Elom Musk : गांजा फुंकताना एलन मस्कने शेअर केला फोटो, नेटिझन्सही राहिले दंग, ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.