AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही’, पंकजा मुंडे यांचा एल्गार

राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी सध्या न्यायालयीन लढाई लढली जात आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आता सत्ताधारी पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'...तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही', पंकजा मुंडे यांचा एल्गार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 30, 2023 | 4:51 PM
Share

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बीडमध्ये आयोजित कार्यकर्मात त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सूचक वक्तव्य केलं. तसेच मराठा आरक्षणासाठी आग्रहाची भूमिका मांडली. दुसरीकडे त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

“राजेंद्र म्हस्के म्हणाले, ताई फेटा बांधा. मी म्हणाले, मी फेटा बांधणार नाही. कधीपर्यंत फेटा बांधणार नाही ते माहिती आहे का तुम्हाला? मराठा आरक्षणाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही. बावनकुळे साहेब, ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं. मी सांगितलं होतं, मी गळ्यात कोणत्याही फुलाचा हार घालणार नाही. मग ते आरक्षण वाचलं. मग लोकांना दम पडला नाही. पण मी फेटा बांधणार नाही”, असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.

विखे पाटील म्हणतात, ‘भावनिक मुद्दा करुन…’

“आरक्षणाच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत नाहीय. आर्थिकदृष्ट्या ज्या ज्या माध्यमातून त्या समाजाच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणता येईल, त्यांना शिकवता येईल. त्यांची व्यवस्था करता येईल, ते सगळे प्रयत्न राज्य सरकार आज करतंय. त्यामुळे आरक्षण मिळायलाच पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पण त्यासाठी भावनिक मुद्दा करुन काही साध्य होणार नाही. सरकार प्रयत्न करत आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

पंकजांचा एल्गार, 2024मध्ये बीडमध्ये इतिहास घडवणार

“2024 च्या निवडणुकीत इतिहास घडवायचा आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. “मी सर्वसमावेशक चेहरा आहे, म्हणून माझ्याकडे सर्वजण पाहत आहेत”, असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. “दुधाने तोंड पोळलंय, आता ताकही संपवून पिण्याची वेळ”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर “बीड जिल्ह्यात 2019 ला अपघात झाला. पण 2024 ला होणार नाही”, असं सूचक वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

“या जिल्ह्याची माया, आईची माया ताईला येत नसते. त्यामुळे ज्या आईने आपल्या मायेने आपलं लेकरु सांभाळावं, तसंच आपल्या जिल्ह्याला सांभाळण्याचं काम मी पाच वर्ष केलं. ठिक आहे, आपल्याला हवं तसं यश मिळू शकलं नाही. या यशामध्ये आडवं येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण ओळखून आहोत. आता याच आडव्या येणाऱ्या लोकांना आणि गोष्टींना आडवं पाडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे”, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.