AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी…’, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या जनतेला भावनिक साद घातली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कदाचित पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारीचं तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. असं असताना आज पंकजा मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.

'लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी...', पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
भाजप नेत्या पंकजा मुंडे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 09, 2024 | 4:42 PM
Share

महेंद्रकुमार मुधोळकर, Tv9 प्रतिनिधी, बीड | 9 मार्च 2024 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? हा प्रश्न सातत्याने चर्चेत येतो. पंकजा मुंडे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून कोणतीही निवडणूक जवळ आली की पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येतं. पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी चर्चेत आलं, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्यावेळी देखील पंकजा यांचं नाव सातत्याने चर्चेत येतं. पंकजा मुंडे या भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे. बीडमधील मोठा जनसमुदाय पंकजा यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. पण तरीदेखील भाजपकडून अद्याप पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कदाचित पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारीचं तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. असं असताना आज पंकजा मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी जनतेला थेट साकडंच घातलं आहे. त्यांच्या या भावनिक आवाहानाला जनता प्रतिसाद देते का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण त्यांच्या भावनिक आवाहानाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

“लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या शिरूर येथे आज सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाषणामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केलं. “मी सध्या माजी असून तुम्हाला काय देऊ? असा प्रश्न मला पडतो. मंचावर बसलेले सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी, असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

‘माझ्यावर रेड पडली तेव्हा…’

“मला कोणी माजी केलं हे आता सांगता पण येत नाही. कारण सगळेच एकत्र आले आहेत. पण जेव्हा माझ्यावर रेड पडली तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी 11 कोटी रुपये जमा केले. हे माझ्या लोकांच्या हृदयाशी जोडलेलं नातं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “सरकार सध्या तीन इंजिनने जोडलेला असून काही वेळ हे इंजिन एकमेकांना भिडले होते. मात्र आता ते बरोबर पटरीवर चालत आहेत”, असं देखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल