AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Freedom Fighter | बीडमधील स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नीची व्यथा, दुकानाचा परवाना दुसऱ्याच्या नावे, राष्ट्रपतींना मागितली देहदानाची परवानगी

बनावट दस्तऐवज तयार करून मद्य विक्रीचा परवाना परस्पर दुसऱ्याच्या नावे करण्यात आलं. त्यामुळं बीडमधील स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा आणि वयस्कर पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे देह त्यागाची परवानगी मागितली आहे. याबाबत सत्यभामा शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडलीय.

Beed Freedom Fighter | बीडमधील स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नीची व्यथा, दुकानाचा परवाना दुसऱ्याच्या नावे, राष्ट्रपतींना मागितली देहदानाची परवानगी
राष्ट्रपतींना मागितली देहदानाची परवानगी Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 3:12 PM
Share

बीड : वयाची 89 वी सर केलेल्या बीडच्या सत्यभामा शिंदे (Satyabhama Shinde). माणसांतल्या विकृती राक्षसी वृत्तीने आणि प्रशासनाने डोळ्यादेखत केलेली फसवणूक पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. सत्यभामा यांचे पती हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना विविध प्रमाणपत्रांनी गौरवण्यात देखील आलंय. स्वातंत्र्यानंतर रंगनाथ शिंदे यांना उदरनिर्वाहासाठी त्याकाळी मद्य विक्रीचा परवाना (Liquor Sales License) देण्यात आला. आष्टी येथे त्यांचा व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र सत्यभामा यांच्या पतीच्या निधनानंतर काही जणांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना (Administration Officer ) हाताशी धरत बनावट कागदपत्रे तयार केली. परस्पर दुकान परवाना नावे केला. नव्वद वर्षीय सत्यभामा शिंदे यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून देह त्यागाची परवानगी मागितली आहे.

 प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविले

बनावट दस्तऐवज तयार करून मद्य विक्रीचा परवाना परस्पर दुसऱ्याच्या नावे करण्यात आलं. त्यामुळं बीडमधील स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा आणि वयस्कर पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे देह त्यागाची परवानगी मागितली आहे. याबाबत सत्यभामा शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडलीय. सत्यभामा यांनी अनेक शासकीय कार्यालयाची उंबरे झिजविली. न्याय तर सोडाच परंतु पदरी निराशाच मिळाली. आता त्या प्रचंड थकल्या आहेत. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी सत्यभामा शिंदे यांनी केलीय. वेळोवेळी प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून देखील न्याय मिळत नाही.

 भ्रष्ट अधिकाऱ्यांना सणसणीत चपराक

राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी देहत्यागाची मागणी केलीय. मात्र यावर अद्याप कोणाचेही उत्तर मिळाले नाही. स्वातंत्र्य लढ्यात संपूर्ण आयुष्य झिजविणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नीला स्वातंत्र्य भारतात आणि पुरोगामी महाराष्ट्रात देहत्यागाची मागणी करावी लागतेय, हे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सणसणीत चपराक आहे.

जगून तरी काय करू ?

मी आता थकली. कष्ट करू करू पीट झालं नाही. राष्ट्रपतींना पत्र दिलं. पंधरा दिवसांत दुकानं द्यावं, नाहीतर जगून काय करू. देहदानाची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी केली. ते प्रत्युत्तर देतील की, नाही माहीत नाही. काय नशिब आपलं. तेवढं काही कळतं नाही मला. आम्ही जुने लोक. असं म्हणून त्यांना अश्रू अनावर झाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.