आधी पवारांची भेट, मग फडणवीसांची, ज्योती मेटे बीडमधून उमेदवारीवर ठाम, पंकजा मुंडे यांचं टेन्शन वाढणार?

बीडच्या राजकारणात पुढचे काही दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. कारण बीडमध्ये सध्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये ज्योती मेटे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी केली जात आहे.

आधी पवारांची भेट, मग फडणवीसांची, ज्योती मेटे बीडमधून उमेदवारीवर ठाम, पंकजा मुंडे यांचं टेन्शन वाढणार?
आधी पवारांची भेट, मग फडणवीसांची, ज्योती मेटे बीडमधून उमेदवारीवर ठाम, पंकजा मुंडे यांचं टेन्शन वाढणार?
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 10:03 PM

भाजप नेते पंकजा मुंडे यांची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपकडून बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडून जोरदार प्रचारदेखील केला जातोय. बीड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. असं असलं तरी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी काही गोष्टी धोकादायक ठरु शकतात. कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेत बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत ते प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उभे होते. ते या निवडणुकीत सेकंड लीडला होते. बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्यांना मविआकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता शरद पवार गटाकडून शिवसंग्रामचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्योती मेटे या स्वत: इच्छुक देखील आहेत.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आम्ही उमेदवारी देऊ, असं म्हटलं आहे. आता ते निर्णय काय घेतात बघू. त्यांच्या चिन्हावर लढा म्हटलं तरीही चालेल. शरद पवारांनी काही निर्णय घेतला नाही तर पुढील भूमिका जाहीर करू”, अशी प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली.

‘विनायक मेटे यांचे कार्य तुम्हाला माहिती’

दरम्यान, ज्योती मेटे यांनी कार्यकर्त्यांसमोरही आपली भूमिका मांडली. “विनायक मेटे यांची पत्नी म्हणून मी ज्योती मेटे पहिल्यांदाच संवाद साधत आहे. लोकनेते विनायक मेटे यांचे कार्य तुम्हाला माहिती आहे. मी त्याबद्दल अधिक काय बोलणार. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येत असताना साहेबांचं दुर्दैवी निधन झालं. शिवसंग्राम परिवाराच्या आयुष्यात 14 ॲागस्ट 2022 उजाडला. आज हे सगळे पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत”, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

‘सगळ्यांची इच्छा होती की मी पुढाकार घ्यावा’

“सगळ्यांची इच्छा होती की मी पुढाकार घ्यावा. पण मी सरकारी नोकरीत होते आणि माझ्यावर काही जबाबदाऱ्या पण होत्या. मी गेले वर्षभर यावर विचार करत होते. मी माझी नोकरी सांभाळून साहेबांचे काम पुढे ठेवण्याचे ठरविले. साहेब मराठा समाजासाठी लढत होते तरी ते इतर समाजासाठी काम करत होते. त्यांनी सामूहिक विवाह सोहळे सुरू केले”, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

शरद पवार गटासोबत सकारात्मक चर्चा सुरु

“⁠गेले काही दिवस बीडमधील लोक म्हणू लागले की बीड लोकसभेतून मी निवडणूक लढावी. माझ्या मनात खरंतर कधीच हा विचार नव्हता. पण समाजातून अनेक लोक तशी मागणी करत होते. ⁠मी यावर विचार केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विचारणा करण्यात आली. त्यांच्याबरोबर माझी बैठक सकारात्मक सुरू आहे. शिवसंग्राम आणि त्यांचे पदाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. त्याबद्दल ते सांगतील”, अशी प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली.

“मला वाटत नाही की बीडमध्ये जातीचे राजकारण होईल, जात बघून लोक निर्णय घेतील. लोकांची मागणी होती. मला उमेदवारी नाही दिली तर आम्ही सर्व मिळून निर्णय घेऊ”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ज्योती मेटे आणि फडणवीसांची भेट

ज्योती मेटे आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावणारी घडामोड घडली होती. ज्योती मेटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत सागर बंगल्यावर दाखल झाल्या होत्या. त्यामुळे ज्योती मेटे यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाते का? किंवा ज्योती मेटे बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा जाहीर करतात का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पण त्यानंतर आता ज्योती मेटे यांनी आपण उमेदवारी लढण्यावर ठाम असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत आपली उमेदवारीबाबत चर्चा सुरु असल्याची प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली आहे.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.