AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde: राजकारण संपल्यावर मी… मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया…गणेशानंद गडावरून ती भावनिक साद

Pankaja Munde Big Statement: मंत्री पंकजा मुंडे या सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारण संपल्यावर आपण काय करणार हे त्यांनी जाहीर केले. तर यावेळी त्यांनी जनतेला एक भावनिक आवाहनही केले.

Pankaja Munde: राजकारण संपल्यावर मी... मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया...गणेशानंद गडावरून ती भावनिक साद
पकंजा मुंडे
| Updated on: Mar 27, 2026 | 11:59 AM
Share

Pankaja Munde Big Statement: राजकारण संपल्यानंतर मी सुद्धा हरिभक्त पारायणाकडे जाणार असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील भायाळा (Bhayala Beed) गावात आयोजित नारळी सप्ताहात त्यांनी हभप होणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी त्यांनी जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानले. गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेत त्यांनी मोठे भावनिक आवाहनही केले. काय म्हणाले पंकजा मुंडे?

गोपीनाथ मुंडे हे नाव विसरू देणार नाही

भायाळा गावात नारळी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे या बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी श्रीराम नवमी उत्सवात सहभाग घेतला. त्यानंतर पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. लोकसभा पराभवानंतर काही लोकांनी आत्महत्या केल्या. इतकं प्रेम भावांनी आपल्यावर केल्याचे त्या म्हणाल्या. तर भगवान गडावर माऊली मंदिराची उभारणी सुरू आहे. या मंदिराला सढळ हाताने कोट्यवधींची मदत करणाऱ्या देणगीदारांची पंकजा मुंडे यांनी पदराने दृष्ट काढली.

तर या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, मी अशी शपथ चितेवर घेतली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी भायाळा गावातील नारळी सप्ताहात घातली.

परळीत रामराज्य यावे

ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने आदर्श राज्यकारभार केला. तसेच रामराज्य हे परळीतही यावे, हीच माझी प्रभू चरणी प्रार्थना असल्याचे मुंडे म्हणाल्या. रामनवमीचा सण आपल्याला सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. परळीतील काळाराम मंदिराला मोठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सालाबादाप्रमाणे रामनवमीनिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला होता. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला. मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पाळणा हलवून प्रभू श्रीरामाला नमस्कार केला, अभिवादन केले.

Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका