चूप रहो, हम कोरोना टेस्ट करने आए है… म्हणत वृद्ध दाम्पत्याला मारहाण, माजलगावात अडीच लाख रुपयांना लुटले

चूप रहो, हम कोरोना टेस्ट करने आए है... म्हणत वृद्ध दाम्पत्याला मारहाण, माजलगावात अडीच लाख रुपयांना लुटले
माजलगाव येथील दरोड्यात वृद्ध महिलेला मारहाण

बीड(माजलगाव): घरात शिरलेल्या सहा दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला लूटल्याची (Robbery) घटना गुरुवारी पहाटे माजलगाव (Beed- Majalgaon) शहर हद्दीतील भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत घडली. घरात घुसताना त्यांना विरोध करणाऱ्या वृद्धांना या लोकांनी ‘चूप रहो, हम कोरोना टेस्ट करने आए है…’ असे म्हणत मारहाण केली. या दरोड्यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाख (theft) रुपयांची लूट केली.

पहाटे 2 वाजता शिरले दरोडेखोर

भाटवडगावात लक्ष्मणराव शिंदे, सावित्री लक्ष्मण शिंदे हे शेतकरी दाम्पत्य राहते. त्यांचे तीन विवाहित मुले, सुना, नातवंडही इथेच राहतात. रात्री उशीरा त्यांचा मोठा मुलगा राजेश शिंदे घरी आला होता. घराचे मेन गेट लावून तो वरच्या मजल्यावर जाऊन झोपलाय खाली हॉलमध्ये संजीवनीबाई व लक्ष्मणराव होते. गुरुवारी पहाटे 2 वाजता सहा दरोडेखोर घरात शिरले. वृद्धांना चाकूचा धाक दाखवत त्यांनी काठीने मारहाण केली.

‘कोरोना टेस्ट कराने आए है..’

घरात नासधूस करणाऱ्या दरोडेखोरांविरोधात वृद्धांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा या दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली. तूम चूप बैठो, हम कोरोना टेस्ट कर रहे है… असे सांगत घरात राडा घालण्यास सुरुवात केली. कपाटातील सगळे साहित्य बाहेर काढले. यात सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी, इतर दागिने, गंठण, मंगळसूत्र, सोन्याचा वेल व रोख रक्कम असा जवळपास 2 लाख 47 हजारांचा मुद्देमाल लांबवला. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भातला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत.

इतर बातम्या-

Nashik| टेम्पोने उडवल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू; अपघात इतका भीषण की, शरीराचे तुकडे-तुकडे

मिर्झापूर-2 मधील ललित अर्थात ब्रह्मा मिश्राचा धक्कादायक मृत्यू, तीन दिवस बाथरूममध्येच मृतदेह पडून


Published On - 10:51 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI