AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृष्णा आंधळेंच तृतीयपंथीयांसोबत कनेक्शन? मोठी बातमी समोर

मोठी बातमी समोर येत आहे, आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी बोलताना त्यांनी कृष्णा आंधळेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

कृष्णा आंधळेंच तृतीयपंथीयांसोबत कनेक्शन? मोठी बातमी समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2025 | 5:59 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या तृप्ती देसाई? 

मध्यंतरी मला एक फोन आला होता, कृष्णा आंधळे हा  महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉण्ड्री वर तृतीयपंथीयांच्या वेशात असू शकतो असं समोरच्या व्यक्तीनं मला सांगितलं. त्यांनी मला हेही सांगितलं की बीड जिल्ह्यातल्या  अनेक तृतीयपंथीयांसोबत त्याचे चांगले संबंध होते. त्यामुळे निश्चितच तृतीयपंथीयांसोबत त्यांचा वेश धारण करून एखाद्या वस्तीमध्ये तो तिथे असू शकतो आणि ते आपण पोलिसांना सांगावं असा मला फोन आला होता.  मात्र त्यामध्ये कितपत सत्य आहे की नाही यामुळे मी तातडीने त्या संदर्भात कोणाशी बोलले नव्हते, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी देशमुख कुटुंबातील सगळ्यांना भेटले त्यांचं एकच म्हणणं आहे, त्यांना तातडीनं न्याय मिळाला पाहिजे. आईने तर मला सांगितलं की जसं माझ्या मुलाला तडफडून मारलं तसं कायद्यानुसार माझ्यासमोर आरोपींना देखील तडफडून मारलं पाहिजे. राज्यामध्ये अशा घटना होतात, त्या मीटवल्या जातात, लपवलल्या जातात. सत्तेच्या माजावर, पैशाच्या माजावर मात्र हे प्रकरण सगळ्यांनी उचलून धरलं म्हणून हे प्रकरण इथपर्यंत पोहोचलं आहे. फास्टट्रॅक कोर्टात सुद्धा अनेक केसेस जातात मात्र वर्षानुवर्षे त्यांना न्याय मिळत नाही, मात्र या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, वाल्मीक कराड 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरीचं जे गुरुपीठ आहे अण्णासाहेब मोरे यांचं तिथे मुक्कामाला होता. त्याबरोबर विष्णू चाटे सुद्धा होता हे दोघेही तिथे राहिले आहेत, त्यांना व्हीआयपी वागणूक व्हीआयपी जेवण दिलं गेल आहे. त्यांना माहीत होतं. खंडणीतील आरोपी आहेत, हत्येतील आरोपी आहेत तरीसुद्धा मुद्दामून त्यांना तिथे ठेवलं गेलं असा आरोपीही त्यांनी यावेळी केला.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?