बेळगावात शिवसेनेच्या रुग्णावाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न, सीमाभागात तणावाचं वातावरण

शहरातील रामलिंग खिंड येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यर्त्यांनी हल्ला केला. (belgaum shiv sena ambulance)

बेळगावात शिवसेनेच्या रुग्णावाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न, सीमाभागात तणावाचं वातावरण
बेळगावमध्ये अशाप्रकारे दोन गटांत बाचाबाची झाली.

बेळगाव : शहरातील रामलिंग खिंड येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यर्त्यांनी हल्ला केला. पोलीस संरक्षण असतानाही हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्ल्यात रुग्णवाहिकेचा बोर्ड तोडण्यात आला आहे. तसेच गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. यावेळी हा प्रकार घडत असताना  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले त्यानंतर कानडी कार्यकर्ते घटनास्थळावरुन पळून गेले. हा प्रकार घडल्यानंतर येथे काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. (Belgaum attack on Shiv sena ambulance tried to breaking down the board of ambulance)

रुग्णावाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न, बोर्डही तोडला

मिळेलल्या माहितीनुसार बेळगाव शहरातील रामलिंग खिंड या परिसरात शेवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कानडी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यामध्ये शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच या रुग्णवाहिकेचा बोर्डसुद्धा तोडण्यात आला. हल्ला झाल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना पळवून लावले.

हा प्रकार घडल्यानंतर येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती होताच खडेबाजारचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर बेळगावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी सुरु केल्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर तसेच शिवसैनिक प्रविण तेजम यांनी केला.

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवण्याचा प्रयत्न

बेळगाव महानगरपालिकेसमोर अनधिकृतपणे लावण्यात आलेला ध्वज काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी (8 मार्च) भव्य निषेध मोर्चा काढला होता. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव मनपासमोर भगवा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ध्वज फडकवत असताना कर्नाटक पोलिसांनी 6 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांनतर या मोर्चेकऱ्यांची पोलिसांनी लगेच सुटका करण्यात आली होती. हा प्रकार घडल्यानंतर मोर्चेकऱ्यांची धास्ती घेत पोलीस प्रशासनाने बेगळागाव शहरात बंदोबस्त वाढविला होता.

इतर बातम्या :

Maharashtra Lockdown | कुठे लॉकडाऊन, कुठे Night Curfew, कुठे कडक निर्बंध, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Pune Lockdown Latest News : पुण्यात रात्रीची संचारबंदी, शाळा 31 मार्चपर्यंत बंद, काय सुरु, काय बंद?

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि पुढं जे केलं त्यानं महाराष्ट्र हादरला !

(Belgaum attack on Shiv sena ambulance tried to breaking down the board of ambulance)

Published On - 3:40 pm, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI