AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदारसंघात रस्ते खराब, आमदाराची लेक बापाविरोधात मैदानात; महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं

मोठी बातमी समोर येत आहे, अहेरी तालुक्यातील अनेक रस्ते अर्धवट असल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून, भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

मतदारसंघात रस्ते खराब, आमदाराची लेक बापाविरोधात मैदानात; महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं
| Updated on: Feb 25, 2025 | 3:43 PM
Share

राजकारणात काहीही होऊ शकतं, आपण अनेकदा काकांविरोधात -पुतण्या, भाऊ विरोधात भाऊ, भाऊ विरोधात बहीण अशा लढती झालेल्या पाहिल्या आहेत. मात्र गेल्या विधानसभेत महाराष्ट्रात अशीही एक लढत होती, जिने संपूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. इथे वडिलांविरोधात थेट लेकच मैदानात होती. मात्र या लढतीमध्ये शेवटी वडिलांचाच विजय झाला.  ही निवडणूक आजही मतदारांमध्ये चर्चेचा विषय आहे. गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात वडील विरूद्ध लेक अशी लढत पाहायला मिळाली.

विधानसभा निवडणुकीमध्ये अहेरी मतदारसंघ हा महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेला होता. या मतदारंसघातून अजित पवार गटानं  धर्मरावबाबा आत्राम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटला मिळाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या मतदारसंघात भाग्यश्री आत्राम हलगेकर यांना तिकीट देण्यात आलं. भाग्यश्री आत्राम या धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात वडील आणि मुलगी यांच्यामधील लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला.

दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा भाग्यश्री आत्राम हलगेकर या आपले वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. वडिलांचा मतदारसंघ असलेल्या अहेरी लातुक्यातील अनेक रस्ते अर्धवट आहेत, त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. भाग्यश्री आञाम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बेशरमाची झाडे रस्त्यावर लावून आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. वडील आमदार असताना लेकीचे त्याच मतदारसंघात चांगल्या रस्त्यांसाठी आंदोलन सुरू आहे, त्यामुळे या आंदोलनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

अहेरी विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्ते खराब असून, दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा होत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना भाग्यश्री आत्राम यांनी दिली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.