Bhandara Crime | सासूरवाडीत आला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, भंडाऱ्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, अद्याप अटक का नाही?

सासुरवाळीत आलेल्या जावयाने घराशेजारील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आरोपी विरुध्द आंधळगाव पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पण, दीड महिना लोटूनही आरोपीला अटक नाही. पोलिसांनी आर्थिक व्यवहार केलाचा पीडित कुटुंबाचा आरोप आहे.

Bhandara Crime | सासूरवाडीत आला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, भंडाऱ्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, अद्याप अटक का नाही?
सासूरवाडीत आला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 1:47 PM

भंडारा : सासुरवाळीत आलेल्या जावयाने घराशेजारील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी (Mohadi) तालुक्यातील पांढराबोडी (Pandharabodi) येथे घडली. गौतम लोणारे असे रेल्वेत लोकोपायलट (Locopilot) असलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरूद्ध आंधळगाव पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड महिना लोटूनही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळं पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पिढीताच्या वडिलाने संशय व्यक्त केला. आरोपी गौतम लोणारे हा वायगाव येथील नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथील त्याची सासुरवाडी आहे. दरम्यान, सासुरवाडीला आलेल्या गौतम लोणारे याने सासऱ्याच्या घराजवळ असलेल्या एका अल्पयीन मुलींवर 21 एप्रिलला अत्याचार केला. याची वाच्यता कुठे केली तर जिवे मारण्याची धमकी सुध्दा दिली. पण पीडित मुलीने घडलेला प्रसंग आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर आंधळगाव ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

कोर्टाने जामीन फेटाळला

सासुरवाळीत आलेल्या जावयाने घराशेजारील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आरोपी विरुध्द आंधळगाव पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पण, दीड महिना लोटूनही आरोपीला अटक नाही. पोलिसांनी आर्थिक व्यवहार केलाचा पीडित कुटुंबाचा आरोप आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत फरार आरोपीचा शोध घेत आहे. आरोपने सेशन्स कोर्टात जामीन मागितला होता. मात्र जामीन रिजेक्ट केला. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. आम्हाला आमच्या पदाची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करीत नाही आहोत, असं सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मठामी यांचं म्हणणंय.

आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप

पण, आता या प्रकरणाला दीड महिना लोटला. आरोपी मिळाला नसल्याने पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांवरच संशय व्यक्त केला आहे. आरोपी रेल्वेत लोको पायलट असल्यानं धनाढ्य आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार झाला असल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली नसल्याचा पीडित मुलीच्या वडिलांचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.