सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट, कर्मचारी नेते काटकर यांचा पुतळा जाळला; येथे अजूनही संप सुरूच

राज्यात समान वेतन लागू असेल. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर आजपासून शाळा, रुग्णालये, सरकारी कार्यालयातील कर्मचारी आपल्या कर्तव्यवर रुजू होतील, असे विश्वास काटकर यांनी सांगितलं.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट, कर्मचारी नेते काटकर यांचा पुतळा जाळला; येथे अजूनही संप सुरूच
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 2:57 PM

भंडारा : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला. राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचारी संपावर गेले होते. जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी, अशी संघटनेची मागणी होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत काल शिष्टमंडळाची चर्चा झाली. जुनी पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली. राज्यात समान वेतन लागू असेल. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर आजपासून शाळा, रुग्णालये, सरकारी कार्यालयातील कर्मचारी आपल्या कर्तव्यवर रुजू होतील, असे विश्वास काटकर यांनी सांगितलं. परंतु, त्यांच्या या निर्णयाला राज्यातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विरोध होताना दिसत आहे.

bhandara 2 n

तो निर्णय आम्हाला मान्य नाही

भंडाऱ्यात संपकरी कर्मचाऱ्यानी कर्मचारी नेते विश्वास काटकर यांच्या पुतळयाला जोडे मारत पुतळा जाळला आहे. काल विश्वास काटकर यांनी संप वापस घेतल्याचा निर्णय घेतला. जुनी पेंशन योजना मान्य न होता संप मागे घेणे चुकीचे आहे. त्यामुळे सुकाणु समितीच्या संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही.

हे सुद्धा वाचा

तोपर्यंत संप मागे घेणार नाही

कर्मचारी नेते विश्वास काटकर यांनी आमच्या विश्वास घात केल्याचा आरोप भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी केला. आंदोलन संपकरी कर्मचारी यांनी कर्मचारी नेते विश्वास काटकर यांच्या पुतळ्याला जोडे मारले. तसेच काटकर यांचा पुतळा जाळला आहे. जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याच्या निर्धार करण्यात आला आहे.

गोंदियात सरकारी कार्यालयात शुकशुकाट

दुसरीकडं गोंदिया जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुकाणू समितीचा निर्णय मान्य नाही. म्हणून सुकाणू समितीचा निर्णय फेटाळला. आजही जिल्हाअधिकारी कार्यलयासमोर सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले. आज संपाचा ८ वा दिवस आहे. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने सरकारी कार्यालय शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हा संप कधीपर्यंत राहणार अशी चर्चा नागरिक करत आहेत. नागरिकांची कामे खोळंबल्याने ते चांगलेच संतापले आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.