AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhaskarrao Patil Khatgaonkar on Fadnavis: देवेंद्र फडणवीस देखणे व्यक्तिमत्त्व, भास्करराव पाटील खतगावकर सुस्साट; भविष्यवाणीही वर्तवली

माजी मंत्री आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज जोरदार फटकेबाजी केली. आता मला काही निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे मी आता केवळ मार्गदर्शन करत राहणार आहे.

Bhaskarrao Patil Khatgaonkar on Fadnavis: देवेंद्र फडणवीस देखणे व्यक्तिमत्त्व, भास्करराव पाटील खतगावकर सुस्साट; भविष्यवाणीही वर्तवली
देवेंद्र फडणवीस देखणे व्यक्तिमत्त्व, भास्करराव पाटील खतगावकर सुस्साटImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 4:34 PM
Share

नांदेड: माजी मंत्री आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांनी आज जोरदार फटकेबाजी केली. आता मला काही निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे मी आता केवळ मार्गदर्शन करत राहणार आहे. स्वर्गीय गंगाधरराव हे गावच्या सरपंचापासून खासदार, राज्यमंत्री बनले. त्यांनी मला साथ दिली. त्यांना स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांची साथ मिळाली. गंगाधरराव हे देखणे व्यक्तीमत्त्व आहे. देवेंद्र फडवणीस हे देखील देखणे व्यक्ती आहे, अशी तुफान फटकेबाजी भास्करराव खतगावकर यांनी केली. निमित्त होतं स्वर्गीय गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाचे. या निमित्ताने खतगावकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) उपस्थित होते. यावेळी भास्करराव खतगावकर यांच्या टोलेबाजीने सभेत एकच खसखस पिकली.

मदत करताना कोण कुठे आहे हे मी पाहत नाही. ते अशोकराव, देवेंद्र पाहतात. आता मी आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत आहे, असे चिमटे भास्करराव खतगावकर यांनी काढले. देवेंद्र फडवणीस आणि अशोक चव्हाण दोघांनाही भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा… पहिला चान्स देवेंद्र यांना. पहिले पाच वर्षे तुमचे. मला माझ्या गुरूने सांगितलं होतं देवेंद्र फडवणीसकडे जा म्हणून. मग भाजपात गेलो. माझ्या गुरूने सांगितलं देवेंद्र यांना दिल्लीत जाण्याची संधी आहे. अशोकराव यांनाही माझ्या भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा आहे, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.

या वयात हात जोडून विनंती

विदर्भ, मराठवाडा, खानदेश यांच्या हक्काचे 300 टीएमसी पाणी आणा. या वयात माझी तुम्हाला हात जोडून विनती आहे. तसेच बाभळी प्रकल्पही मार्गी लावा. नांदेडला बुलेट ट्रेन आणण्यासाठी फडवणीस यांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही खतगावकर यांनी केली.

जाये तो जाये कहाँ

जिल्ह्यातील सगळ्यांना एकत्र बघायची माझी दहा वर्षांची इच्छा पूर्ण झाली. अशोकराव यांना तर पाहून 15 वर्ष झाली होती. चार चार दशकांचा राजकीय इतिहास असणारी माणसं आता आढळणार नाहीत. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही जे फिरतात ते पाहून स्वर्गीय गंगाधरराव यांची आठवण येते. पायाला पंख लावून फिरणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडवणीस. सरकार आघाडीचे असले तरी नाव फडवणीस यांचेच असते. आघाडी सरकारला काम दाखवायची संधी मिळत नाही. आमच्या जिल्ह्यात गलका करणारा कोणत्याच पक्षात तुम्हाला सापडणार नाही, असं माजी मंत्री सुर्यकांता पाटील म्हणाल्या. मला आयुष्यात काहीच मिळवायच नाही. भाजपमध्ये तुमच्यामुळे मी आले. मला अशोकरावां सारखा मेहुणा नाही. त्यामुळे मला कुठेच जायचं नाही. जाये तो जाये कहाँ, असं सुर्यकांत पाटील यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

संबंधित बातम्या:

अशोकराव, तुम्ही मध्यस्थी करा, मुख्यमंत्र्यांना समजावा, बुलेट ट्रेनचं काम पूर्ण करा, देवेंद्र फडणवीसांची साद

Inflation : युवासेनेचं राज्यव्यापी थाळी बजाव आंदोलन, रस्त्यावर भाकरी, पुतळ्याला जोडे, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

Pakistan Political Crisis: इमरान खान नॉटआऊट! अविश्वास प्रस्ताव रद्द का झाला? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या!

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.