AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, दोन बडे नेते करणार भाजपात प्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, दोन बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, दोन बडे नेते करणार भाजपात प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 31, 2025 | 1:56 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाला देखील वेग आला आहे. आता या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यातील एक प्रवेश उद्या म्हणजे मंगळवारी होणार आहे, तर दुसरा पक्षप्रवेश हा एक ऑगस्टनंतर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 50 खोके, एकदम ओके म्हणणारा काँग्रेसचा नेताच आता भाजपमध्ये जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसला जालन्यात मोठा धक्का बसला आहे.  काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि पाथरीचे  माजी आमदार सुरेश वरपूडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुरेश वरपूडकर हे उद्या मंगळवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. तर कैलास गोरंट्याल यांचा एक तारखेनंतर भाजपात पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे, कैलास गोरंट्याल यांच्यासोबत काही नगरसेवकही भाजपात प्रवेश करणार आहेत. गोरंट्याल यांच्या पक्ष प्रवेशावेळी भाजप नेते अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये गोंरट्याल भाजपात प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार सुरेश वरपूडकर हे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत, तर कैलास गोरंट्याल  यांचा भाजपात होणारा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे, ते 1 तारखे नंतर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः गोरंट्याल यांनी दिली आहे. उद्या सुरेश वरपूडकर यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचंही यावेळी गोरंट्याल यांनी सांगितल आहे.  दरम्यान माझ्या पक्षप्रवेश सोहळ्याला अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अतुल सावे उपस्थित राहणार असल्याची माहितीही यावेळी गोरंट्याल यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.  आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसणार आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.