मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटात मोठा पक्ष प्रवेश, ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटानं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे, नेत्यानं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकेर गटात प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटात मोठा पक्ष प्रवेश, मातोश्रीवर घडामोडींना वेग
शिवसेना ठाकरे गटात मोठा पक्षप्रवेश
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 08, 2026 | 4:16 PM

येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षांतराला ब्रेक लागेल अशी आशा राजकीय पक्षांना होती, मात्र तरी देखील पक्षांतर सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. ऐनवेळी नेते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्यानं अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे, दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत असून, काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, शिवसेना ठाकरे गटात मोठा पक्षप्रवेश झाला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीमधील अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला, मात्र विधानसभा निवडणुकीत हे यश महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, राज्यात महायुतीला तब्बल 232 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला अवघ्या 50  जागांवरच समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागली.  अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला. तर काही जणांनी आपल्याच पक्षांच्या मित्रपक्षात देखील प्रवेश केल्याचं पहायला मिळालं.  दरम्यान पक्षाला लागलेली गळती काँग्रेससाठी सुद्धा डोकेदुखीचा विषय ठरला आहे, त्यातच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून, कुणाल जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला.