AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शरद पवारांना धक्का, बड्या नेत्यानं दिला राजीनामा, घेतला मोठा निर्णय

महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, पक्षांतराला देखील वेग आला आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून, बड्या नेत्यानं राजीनामा दिला आहे.

मोठी बातमी! शरद पवारांना धक्का, बड्या नेत्यानं दिला राजीनामा, घेतला मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2025 | 8:06 PM
Share

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र या निवडणुकांपूर्वी पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे, आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीमध्ये सुरू असलेलं इनकमिंग अजूनही सुरूच आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या देखील अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाची साथ सोडून भाजप आणि महायुतीमधील इतर पक्षात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये, पक्षप्रवेश सुरूच असल्यानं महायुतीमध्ये सुरू असलेलं हे इनकमिंग आता महाविकास आघाडीसाठी मोठी डोकदुखी ठरत आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांसमोर असणार आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवला आहे. ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.  दरम्यान ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. दिलीप चव्हाण हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं हिंगोली जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना हे यश टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, त्यानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं आहे, ते अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

Follow Us
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग