AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, भाजपने युतीबाबत केली मोठी घोषणा

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं जोरात वाहत आहे, प्रचाराला देखील वेग आला आहे, मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे, आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, भाजपने युतीबाबत केली मोठी घोषणा
भाजप, शिवसेना Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 3:17 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर त्यानंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यात आहे. महापालिका निवडणूक कार्यक्रमाची देखील लवकरच घोषणा होऊ शकते. दरम्यान दुसरीकडे मात्र महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपात मोठं इनकमिंग सुरू आहे, याचा फटका हा विरोधकांना बसण्याऐवजी सर्वात जास्त शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटालाच बसत आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तर ही नाराजी आणखी वाढल्याचं पहायला मिळत आहे, शिवसेना शिंदे गटातून मोठ्या प्रमाणात भाजपात पक्षप्रेवश होत आहेत. यावरून शिवसेना शिंदे गट नाराज आहे, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालून आपली नाराजी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, सध्या महायुतीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान आता राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे.

भाजपचे प्रदेश सचिटणीस विजय चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे.  नंदुरबार जिल्ह्यात आता शिवसेना शिंदे गटासोबत कधीही युती होणार नाही, अशी घोषणा विजय चौधरी यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्ते भाजपाच्या उमेदवारांना धमकावत आहेत. आमच्या उमेदवारांना धमक्या देणाऱ्या लोकांना जशास तसं उत्तर देऊ, नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाकडून अनेक वर्षापासून भ्रष्टाचार केला जात आहे, असा आरोपही यावेळी विजय चौधरी यांनी केला आहे.  दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. देशविघाती कृत करणाऱ्या लोकांवर कारवाई होते , मात्र त्याच लोकांचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार समर्थन करतात, असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  उद्या नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकेच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. शहादा शहरात फडणवीस यांची सभा होणार असून, ही सभा ऐतिहासिक सभा होईल, अशी माहितीही यावेळी विजय चौधरी यांनी दिली आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...