AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, आणखी एक नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, आता आणखी एका मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसणार आहे.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, आणखी एक नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ
| Updated on: Jul 27, 2025 | 8:14 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या तब्बल 232  जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतानं आलं.

मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र आहे. एकामागून एक नेते आणि पदाधिकारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.

दरम्यान आता आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसणार आहे. गुहागरमधील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या नेत्रा ठाकूर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरेंसोबतच भास्कर जाधव यांना देखील मोठा धक्का मानला जात आहे. ठाकूर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कदम यांची प्रतिक्रिया 

दरम्यान या पक्षप्रवेशावरून रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.  भास्कर जाधव यांची आज झोप उडून जाणार आहे, गुहागरमध्ये मोठा पक्ष प्रवेश आहे. मीच माझी पाठ थोपटून घेतली पाहिजे, मातोश्रीची निष्ठा आम्हाला काय शिकवता,काँगेससोबत गेलात आणि आम्हाला निष्टा शिकवता. माजी आमदार संजय कदम पुन्हा आपल्या कुटुंबतबात आले,  संजय कदम यांच्या बाबतीत महामंडळाचा एखादा निर्णय व्हावा, अशी विनंतीही यावेळी कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी घरी बसायचा निर्णय घेतला होता, पण शिंदे साहेबानी मला पुन्हा कामाला लावलं. वय झालं असलं तरी आता थांबणार नाही, कोण तो अनिल परब, त्यांच्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही. 35 ची नोटीस दिल्याशिवाय आरोप करता येत नाहीत, मग हे कसं काय झालं, हे काय मॅनेज झालं का ? असा सवालही यावेळी कदम यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.