मोठी बातमी! ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना दणका, प्रमुख शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश, ठाकरे गटात खळबळ

Ajit Pawar : अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना दणका, प्रमुख शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश, ठाकरे गटात खळबळ
Ajit Pawar And Uddhav Thackeray
Image Credit source: X
| Updated on: Jan 05, 2026 | 10:23 PM

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या आगामी निवडणुकीच्या तयारीलाही सुरुवात झाल्याचे चित्र आहे. अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किशोर जैन यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याबाबत माहिती देताना अजित पवार यांनी एक सोशल मिडिया पोस्ट केली आहे. यात अजित पवार यांनी म्हटले की, आज किशोर जैन यांच्यासह विविध पक्षांतील अनेक मान्यवरांनी पक्षाच्या विचारधारेला स्वीकारून जनसेवेची वाट धरली. या सर्वांचं मनापासून स्वागत आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा दिला. राजकारणात मूल्य, संस्कार आणि विकास यांची सांगड कशी घालायची, हे त्यांनी शिकवलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच विचारांवर चालणारा पक्ष आहे. किशोर जैन यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात समाजकार्यातून केली. शिक्षण, सहकार आणि समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महत्त्वाच्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालून आपल्याला मिळून सर्वसमावेशक, समताधिष्ठित विकास करायचा आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये रोहा, कर्जत, मुरुड-जंजिरा इथल्या जनतेनं जे पाठबळ दिलं आहे त्याबद्दल मतदारांचे आभार. पुढील काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महत्त्वाच्या आहेत. कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. इथे पर्यटन, कृषी पर्यटन आणि उद्योगांना मोठी संधी आहे. रिलायन्ससह विविध उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून स्थानिकांना रोजगार कसा मिळेल, यावर भर दिला जात आहे.

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जात–पात, नातेगोते न पाहता मूलभूत गरजा सोडवणं, पर्यावरणाचा समतोल राखणं, तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी देणं, लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना योजनांद्वारे मदत करणं हे आमचं प्राधान्य राहिलं आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभा आहे.