AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 5-7 दिवसांचं आयुष्य, पंखावर नागाचं तोंड आणि… कुठे सापडलं सर्वात मोठं फुलपाखरू “ॲटलास मॉथ”; ?

जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेले "ॲटलास मॉथ" हे फुलपाखरू सांगलीतील शिराळ येथे सापडलं आहे. शिराळा येथील बस स्थानक शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात दिसले . ते पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती

अवघ्या 5-7  दिवसांचं आयुष्य,  पंखावर  नागाचं तोंड आणि... कुठे सापडलं सर्वात मोठं फुलपाखरू ॲटलास मॉथ; ?
जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेलं "ॲटलास मॉथ"
| Updated on: Sep 24, 2024 | 1:44 PM
Share

जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेले “ॲटलास मॉथ” हे फुलपाखरू सांगलीतील शिराळ येथे सापडलं आहे. शिराळा येथील बस स्थानक शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात दिसले . ते पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. निवासस्थानाच्या आवारात असलेल्या पडद्यावर सकाळी 9 पासून ते संध्याकाळी साडेसातपर्यंत बसले होते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पंखाच्या टोकांवर नागाचे तोंड व आकार दिसत होता. शिराळ्यात नागाचे फुलपाखरू आले ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली त्यामुळे हे फुलपाखरू पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

याठिकाणी असणारे व्यावसायिक संजय यादव , राजेंद्र सावंत , सुनंदा सावंत , पूजा सावंत यांनी हे फुलपाखरू पाहिले. जवळपास अकरा इंच मोठे हे फुलपाखरू होते. महत्त्वाचे म्हणजे याच्या दोन्ही पंखाच्या टोकाला नागाचेतोंड व आकार दिसत होता.फुलपाखराच्या दोन्ही पंखावर नागाचे तोंड दिसल्यामुळे त्याचे फोटो काढण्यासाठीही झुंबड उडाली होती. अनेकांनी याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल वर या प्रजातीबद्दल माहिती शोधली . हे फुलपाखरू अतिशय दुर्मिळ आणि जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असून “ॲटलास मॉथ” असे त्याचे नाव असल्याचे समजले.

अवघ्या पाच-सात दिवसांचं आयुष्य ..

गातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये “ॲटलास मॉथ”ची गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला “ॲटलास मॉथ” म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट (आळी) असतानांच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते. या फुलपाखराचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसाचे असल्याने या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे फुलपाखरू अखरेचा श्वास घेतं.

शक्यतो रात्रीच दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होणारं हे फुलपाखरू निशाचर आहे, क्वचितच ते दिवसा आढळतात. मात्र सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात ते प्रकर्षाने दिसतात. हे फुलपाखरू दालचीनी, लींबू, जांभुळ, पेरू व लींबू वर्गीय झाडांवरच आढळतं. तिथेच त्याचे प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात. मादी एका वेळेस 100 ते 200 अंडी घालते. ही अंडी दहा ते चौदा दिवसांत उबवून त्यातून अळी बाहेर येते.ही अळी 35 ते 40 दिवस सतत झाडांची पाने खातच राहते. 21 दिवसांनंतर कोशातून फुलपाखरू बाहेर येते. त्यानंतर अंडी घालून ते फुलपाखरूही मरतं. नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मीळ जीव बरेचदा दक्षिण-पूर्व आशियात आढळतो.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.