AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटलांकडून आता मोठी मागणी, सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम, ..तर संपूर्ण राज्य बंद करण्याचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी आता मोठी मागणी केली आहे, मालेगावमधील पीडितेला सरकारने न्याय द्यावा, कायद्यात बदल करा, काहीही करा, पण आरोपीला फाशी द्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटलांकडून आता मोठी मागणी, सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम, ..तर संपूर्ण राज्य बंद करण्याचा इशारा
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2025 | 8:29 PM
Share

मालेगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  मालेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून, दगडाने तिचं डोकं ठेचून हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी पीडितेच्या वडिलांनी आपली व्यथा मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात आली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आता मनोज जरागे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. मुख्यमंत्री, महोदय दोन महिन्याच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या, नाहीतर त्याचा  एन्काऊंटर करा अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

मुख्यमंत्री, महोदय दोन महिन्याच्या आत कायदा करा, आणि आरोपीला फाशी द्या, नाहीतर त्याचा एन्काऊंटर करा. लाडकी लेक म्हणतात, लाडकी बहीण म्हणतात तर त्यांना न्याय द्या. न्याय देता येत नसेल तर तुमचे तोंड काळे करा.  दोन महिन्याच्या आत न्याय न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, कायद्यात बदल करा, काहीही करा, पण न्याय द्या.  येत्या मंगळवारी कॅबिनेट बैठकीमध्ये कायद्यात दुरुस्ती करा, बाल लैंगिक सुधारणा कायद्यात दुरुस्ती करा, पीडितेच्या नावाने कायदा करा.  या प्रकरणात उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करा, अशी मोठी मागणी या प्रकरणात जरांगे पाटील यांनी केली आहे.

महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करा, आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या. न्याय न दिल्यास तुम्ही निर्दयी मुख्यमंत्री आहात असं आम्ही समजू,  मालेगाव, नाशिकसह संपूर्ण राज्य बंद करणार आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान पीडित कुटुंबियांनी दहा दिवसांची मुदत सरकारला दिली आहे. अकराव्या दिवशी जर मला बोलावले तर त्या कुटुंबासाठी मी केव्हाही रस्त्यावर उतरेल. कुटुंबीयांशी चर्चा करताना काही मागण्या आम्ही कागदावर नोट केल्या आहेत,  त्या सर्व मुख्यमंत्र्यांकडे पाठवू आणि आरोपीला फाशीची शिक्षा देवू, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.