AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याच्यावर ठाकरेंनी लावला सर्वात मोठा डाव तोच हुकमी एक्का आता शिंदेंच्या गळाला; बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ज्याच्यावर ठाकरेंनी लावला सर्वात मोठा डाव तोच हुकमी एक्का आता शिंदेंच्या गळाला; बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2025 | 3:10 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. एकीकडे नाशिकमध्ये दोनच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, त्यानंतर त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती. आज शिवसेना ठाकरे गटाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे, सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे, याबाबत स्वत: चंद्रहार पाटील यांनी  माहिती दिली आहे. ‘माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत, मी अधिकृत भूमिका घेतली नाही, शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा ,पक्ष सोडायचा याबाबतचा अजून निर्णय घेतला नाही, सध्या मी बाहेरगावी असून माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन.’ असं चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे. त्यामुळे आता चंद्रहार पाटील हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं, या मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील हे देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. त्यामुळे या निवडणुकीत सांगलीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र तरी देखील उद्धव ठाकरे हे सांगलीमधून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम होते. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली, तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत विशाल पाटील हे विजयी झाले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी