मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, राज्यात खळबळ

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली.

मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, राज्यात खळबळ
MP HEMANT PATILImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 5:23 PM

यवतमाळ : | 29 ऑक्टोंबर 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज ज्रांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात वणवा पेटला आहे. अनेक गावांमध्ये नेते, मंत्री, आमदार यांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. जिथे जिथे नेते जातील तिथे मराठा आंदोलक जाऊन त्यांचा निषेध करत आहेत. मराठा आरक्षणासाठी विविध जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी आपापले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. काही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देत सरकारला धारेवर धरले आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिंदे गटाच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय.

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. हेमंत पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात आपल्या कार्याची सुरवात केली. हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. हेमंत भाऊ या नावाने ते या दोन्ही जिल्ह्यात परिचित आहेत. हिंगोली मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले.

राज्यात सत्ता परिवर्तन होताच उद्धव ठाकर यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नांदेड येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर खासदार हेमंत पाटील यांनी शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना शौचालय साफसफाई करायला लावले होते. त्यामुळे खासदार हेमंत पाटील राज्यात चर्चेत आले होते.

हे सुद्धा वाचा

मराठा समाजातील आरक्षणाची मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.

खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांना लिहिलेल्या पत्रामध्ये, ‘ महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा समाजाच्या भावना या विषयी अतिशय तीव्र आहेत. मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी मी अनेक वर्ष भांडत आहे. त्यामुळे मराठा समाजच्या आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठींबा आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.