खोक्या भाईच्या घरातील ‘त्या’ पिशवीमुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट, बॅगेत नेमकं काय सापडलं?
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर आज सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वनविभागाकडून बुलडोझर चालवण्यात आला आहे, याचदरम्यान त्याच्या घरात एक पिशवी सापडली आहे.

खोक्या उर्फ सतीश भोसले याला अटक करण्यात आली आहे, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान आता वनविभागाकडून देखील खोक्याला मोठा दणका देण्यात आला आहे. खोक्या राहात असलेलं घर हे वनविभागाच्या हद्दीत असल्याचं समोर आलं आहे, या प्रकरणात वनविभागाकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आज त्याच्या घरावर बुलडोझर देखील चालवण्यात आलं, आज वनविभागाकडून खोक्याचं घर पाडण्यात आलं आहे.
दरम्यान खोक्याचं घर पाडण्यापूर्वी त्यातील सामान एका ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आलं. मात्र खोक्याच्या घरातील सामान बाहेर काढत असताना त्याच्या घरामध्ये वनविभागाला एका पिशवी देखील आढळून आली आहे. वनविभागानं त्याच्या घरातील इतर सामान ट्रॅक्टरमध्ये ठेवलं, मात्र ती पिशवी वेगळी ठेवण्यात आली आहे. या पिशवीमुळे आता या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे. या पिशवीमध्ये नेमकं काय आहे? हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये. मात्र या पिशवीत काही तरी महत्त्वाची गोष्ट असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान यापूर्वी देखील खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घराची झाडाझडती पोलीस आणि वनविभागाकडून घेण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या घरामध्ये जनावरांचं सुकलेलं मांस आणि शिकारीचं साहित्य आढळून आलं होतं. त्याचं घर वनविभागाच्या जागेत बांधण्यात आलं आहे, या प्रकरणात वनविभागाकडून त्याला नोटीस देण्यात आली होती, त्यानंतर आता त्याचं घर पाडण्यात आलं आहे. त्याचे अनेक वादग्रस्त व्हिडीओ देखील व्हायर झाले आहेत.
शिरूरमधील ढाकणे कुटुंबातील व्यक्तींना केलेल्या मारहाणीनंतर सतीश भोसले फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते, अखेर उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आलं, त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तसेच आता त्याच्या घरावर वनविभागाकडून कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याचं घर पाडण्यात आलं आहे, याचदरम्यान तिथे वनविभागाला एक पिशवी आढळून आली आहे.