AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या घडामोडींना वेग, सरकारचे प्रतिनिधी जरांगेंशी बोलणार, मुंबईकडे येणार की मागे फिरणार? फैसला लगेच होणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेना रवाना झाले आहेत. मात्र आता रात्रीच सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोठ्या घडामोडींना वेग, सरकारचे प्रतिनिधी जरांगेंशी बोलणार, मुंबईकडे येणार की मागे फिरणार? फैसला लगेच होणार?
Manoj-Jarange-Patil-Devendra-Fadnavis
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 27, 2025 | 11:09 PM
Share

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेना रवाना झाले आहेत. आज रात्री ते शिवनेरीवर मुक्कामी असणार आहेत. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचणार असून आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. मात्र आता रात्रीच सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज रात्री ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सरकारचे प्रतिनिधी रात्रीच जरांगे पाटलांना भेटणार…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे यांना भेटणार आहेत. मनोज जरांगे यांच्यासोबत वाहनांची संख्याही जास्त आहे, त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांना भेटण्याची शक्यता आहे. मात्र या प्रतिनिधींमध्ये कोणते नेते असणार याबाबत माहिती समोर येऊ शकलेली नाही. एक वरिष्ठ नेता जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. हा नेता सरकारचा निरोप जरांगे पाटलांनी देणार असल्याचेही बोलले जात आहे.

सरकारकडून प्रस्ताव दिला जाणार?

सरकारच्या प्रतिनिधींकडून मनोज जरांगे पाटील यांच्या समोर आंदोलन मागे घेण्याबाबत प्रस्ताव ठेवला जाणार का? जरांगे पाटलांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार का? किंवा सरकारकडून काही आश्वासन दिले जाणार का? तसेस सरकारने जर काही प्रस्ताव दिला तर तो जरांगे पाटील स्वीकारणार का? हे आणि यासारखे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मात्र आता या सर्व प्रश्नांची उत्तर अल्पावधित समोर येणार आहेत.

सरकार चर्चेसाठी तयार – विखे पाटील

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. ‘चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे, त्यांची तयारी असेल तर आम्ही देखील तयार आहोत, मात्र त्यासाठी दोन्हीही बाजूने समन्वय झाला पाहिजे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत जरांगे पाटलांनी निर्णय घ्यायचा आहे, शासनाची यात कुठलीही भूमिका नाही, सरकारने यापूर्वीही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नव्हता आणि आताही नाही’ असं विधान विखे पाटलांनी केलं आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?