राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर, सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे. विधानसभेत फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर, सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2025 | 4:39 PM

मोठी बातमी समोर येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे, फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला, त्यानिमित्तानं विधानसभेत  निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे.  ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.  उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे.  ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे, फडणवीस यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष असल्याचंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबईमध्ये पाच जुलै रोजी विजयी मेळावा पार  पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधुंची उपस्थिती होती, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती, या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे, याच दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिल्यानं फडणवीसांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.