चित्रा वाघ, धनंजय महाडिक यांना भाजपात मोठी जबाबदारी

धनंजय महाडिक (कोल्हापूर) (Dhananjay Mahadik), शेखर इनामदार (सांगली) आणि चित्रा वाघ (मुंबई) यांची (Chitra Wagh) प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं.

Dhananjay Mahadik, चित्रा वाघ, धनंजय महाडिक यांना भाजपात मोठी जबाबदारी

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संघटनात्मक बदल घेत नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. धनंजय महाडिक (कोल्हापूर) (Dhananjay Mahadik), शेखर इनामदार (सांगली) आणि चित्रा वाघ (मुंबई) यांची (Chitra Wagh) प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्याबद्दल संपर्क अभियान आणि जनजागरण अभियानासाठी समिती नेमण्यात आली आहे. भाजपकडून लोकांमध्ये जाऊन या निर्णयाबाबत सांगितलं जाणार आहे.

संपर्क अभियान, जनजागरण अभियान

 • राजेश पांडे, संयोजक
 • मुंबई – राजीव पांडे, सुनील राणे
 • कोकण – सुभाष काळे, दीपक जाधव
 • पश्चिम महाराष्ट्र – भरत पाटील, नामदेव ताकवणे
 • उत्तर महाराष्ट्र – अरविंद जाधव, सुनील बच्छाव
 • मराठवाडा – बसवराज मंगरुळे, राम कुलकर्णी
 • विदर्भ – देवेंद्र दस्तुरे, शिवराय कुलकर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून राज्यात सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या कामाची जबाबदारीही एका समितीवर टाकण्यात आली आहे.

 • प्रदेश संयोजक – योगेश गोगावले
 • मुंबई – विनोद तावडे, आशिष शेलार, योगेश सागर
 • कोकण – संजय वाघुले, ॲड. हर्षद पाटील
 • विदर्भ – राजेंद्र डांगे, मिलिंद भेंडे
 • मराठवाडा – संजय केणेकर, सुरेंद्र कुलकर्णी, शैलेष गोजमगुंडे
 • उत्तर महाराष्ट्र – उन्मेष पाटील, प्रशांत पाटील
 • पश्चिम महाराष्ट्र – शेखर इनामदार, श्रीनाथ भिमाले
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *