नागपूर: भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन वाटपात विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या सरकारमधील हेवीवेट मंत्री सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव बनवून त्यांच्या जिल्ह्यासाठी दुप्पट ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर नेत आहेत. मराठवाड्यातील एका मंत्र्यांनं 10 हजार रेमडेसिव्हीर स्टॉक केले. पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यानं 25 हजार इंजेक्शन नेले. ठाण्यात एका रुग्णामागं दोन इंजेक्शन आणि नागपूरमध्ये 2 रुग्णांमागं एक इंजेक्शन मिळत,असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. राज्यातील वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन घेत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. नागपूरमधील मंत्री जिल्ह्याला रेमडेसिव्हीर मिळवून देण्यात कमी पडत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. (BJP leader Chandrashekhar Bawankule slams mva ministers did injustice with Vidarbha in distribution of Remdesivir and oxygen )