भाजपा नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, व्हिडीओ आला समोर
भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांना अज्ञातांद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना यापूर्वी अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत.

भाजपाच्या अमरावतीच्या नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्याने व्हिडीओद्वारे त्यांना धमकी दिली असून यामुळे अमरावतीत पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. भाजपाच्या फायरब्रँड नेत्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना याआधी अनेक वेळा धमक्या देण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणात पोलिस यंत्रणा तपास करीत आहेत.
भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांना अज्ञातांद्वारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.या धमकी देणाऱ्या व्हिडीओ व्हायरल करुन धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांना आलेल्या धमक्यांमध्ये त्यांना अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरुन शिवीगाळ करण्यात आली आहे. या व्हिडीओत शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने त्यांना अंधभक्त म्हणत जातीवादी भाषा केली तर आमच्या पेक्षा वाईट कोणी नाही अशा हिंदी भाषेत व्हिडीओ व्हायरल केला आहे.
भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर सोशल मीडियावर रिल्स तयार करून त्यांना गळा कापण्याची आणि जीवाने मारण्याची धमकी दिलेली आहे यात अश्लिल शिवीगाळ केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही अनेकवेळा नवनीत राणा यांना आले आहे जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीला जेरीस आणले
अमरावतीच्या नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याने महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्य सरकारला जेरीस आणणारी अनेक आंदोलने केली होती. उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे कलानगर येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणून आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपाने त्यांना खासदार कीचे तिकीट दिले होते. परंतू लोकसभेला त्यांचा पराभव झाला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय ?
नवनित राणा अमरावली जिले की पहले पतपर रहने वाली एक ××××,बहोत बोल रही तु आ.
अरे यह हिंदुस्थान मुगलो का नही है तेरे जैसे अंध भक्त का है, अंध भक्त की ×××××× करन वाली ××××.
नवनित राणा यह हिदुस्थान सब का है, हिंदू, मुस्लिम, सिख, इसाइ सब है अपने भाई.
तू कभी जातीवादी की बाता करेगी तो हमारे सें बुरा कोई नही होगा.
इसके पहले बहोत बार मार खा चुकी तुने, इस बार छोडे नही जायेगा डायरेक्ट कत्ल कर जायेंगा हा.
अकलमद को इशारा मस्ती नही बापसे, देख लेना मियॉ भाई अपने हिसाब से,बहोत बुरा हो जायेगा..
परपर भामेगी तु ××××× नवनित राणा..”
