पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये, दोन फोटोंसह नवा किस्सा शेअर

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde Mahabaleshwar) सध्या व्हेकेशन मूडमध्ये आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:59 PM, 23 Jan 2021
पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये, दोन फोटोंसह नवा किस्सा शेअर
पंकजा मुंडे

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde Mahabaleshwar) सध्या व्हेकेशन मूडमध्ये आहेत. नुकतंच त्यांनी मुलगा आणि पतीसोबत महाबळेश्वरची छोटी टूर केली. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंकजा मुंडे यांनी या टूरच्या निमित्ताने आलेले काही अनुभवही शेअर केले आहेत. लोकांनी गाडी थांबवून फोटोसाठी केलेली विनंती, लोकांच्या प्रेमाचा, आग्रहाचा किस्सा पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. “लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नसतो. पण मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो. दोन दिवस हवा बदल म्हणून मी पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते. परत येताना रस्त्यात नेहमी प्रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली ड्रायव्हर लोंढे होते. त्यांनी अगदी भावूक होऊन माझ्या कार्यक्रमाची इतंभूत माहिती ते कशी ठेवतात हे सांगितले. अगदी माझ्या पोस्ट किती ते आपुलकीने like करतात हेही सांगितले. तितक्यात गाडीतील विद्यार्थी उतरले बाजूच्या बस मधील प्रवासी उतरले त्यांनी ही फोटो काढले. गाडीत बसलेला माझा मुलगा कौतुकाने हे बघत होता”, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं.

धनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य नाही 

दरम्यान, पंकजा मुंडे यांचे बंधू आणि राजकीय शत्रू असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराची तक्रार दाखल केली होती. यानंतर भाजपने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करुन, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती.  मात्र नुकतंच रेणू शर्मा यांनी ही तक्रार मागे घेतल्याने, प्रकरणालाच कलाटणी मिळाली.

या सर्व प्रकरणादरम्यान, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया नेमकी काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला होता. मात्र त्यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

संबंधित बातम्या   

धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, जयंत पाटील म्हणतात…. 

पंकजा मुंडे कुठे आहेत?; मौनामागचं कारण काय? 

(Pankaja Munde Mahabaleshwar)