AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला मारायचं तर मी बारामतीत येतो, त्यांनी तारीख, वेळ सांगावी…; पडळकरांचे रोहित पवारांना ओपन चॅलेंज

सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्या प्रकरणी रोहित पवारांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. पडळकरांनी रोहित पवारांना खुला आव्हान देत त्यांना भेटण्यास सांगितले आहे. अपहरणातील आरोपींना अटक झाली असून, पडळकर यांनी २०२१ मध्ये झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणाचीही पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मला मारायचं तर मी बारामतीत येतो, त्यांनी तारीख, वेळ सांगावी...; पडळकरांचे रोहित पवारांना ओपन चॅलेंज
rohit pawar gopichand padalkar
| Updated on: Aug 08, 2025 | 12:32 PM
Share

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोलापुरातील एका कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. शरणू हांडे असे मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. शरणू हांडे यांचे अपहरण करणारा मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडेची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवारांना ओपन चॅलेंज देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. रोहित पवारांना मला मारायच असेल तर सांगा, मी बारामतीत कधी येऊ. त्यांनी तारीख सांगावी, वेळ सांगावी आणि ठिकाण सांगावं मी तिथे येतो, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

मी २०२१ ला घोंगडी बैठका घेत होतो. त्यावेळी मी लहान लहान समाजाला एकत्र करण्याचे काम करत होतो. मी ४०० ते ४५० बैठका घेतल्या होत्या. त्यातीलच एक भाग म्हणजे मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी संध्याकाळी माझ्या गाडीवर दगड टाकला. सूरवसे या व्यक्तीने गाडीवर दगड टाकला, त्याच्या छातीवर शरद पवारांचा टॅटू आहे. त्यावेळी आमचं सरकार नव्हतं. मी तेव्हा त्याच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करा असं सांगत होतो. त्याने मी जिथे बसतोय, तिथे दगड टाकला होता. महादेव देवकाते नावाचा एक व्यक्ती आहे. त्याच्या छातीवरही शरद पवारांचा टॅटू आहे. त्याने माझी भेट घेतली. महादेव देवकाते म्हणतोय की गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती. त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

सर्वांना अटक करायला हवी

“शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडीओ कॉल लावला होता. तो कुणाला लावला. पुढून कोण बोलत होतं. कोणत्या फोनवरुन व्हिडीओ कॉल झाला. व्हिडीओ कॉलवर त्याला माफी मागायला सांगितली असं त्याचं म्हणणं आहे. तर याचा सर्व सखोल अभ्यास करा. ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही. कुणीतरी याला पाठीमागे असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही. जर पोलिसांना उशीर झाला असता तर नक्कीच काहीतरी घातपात झाला असता. २०२१ ला माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली त्याची फेरचौकशी झाली पाहिजे. त्यावेळी कोण कोण होतं या सर्वांना अटक करायला हवी”, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.

तुमच्यात हिंमत असेल तर…

“याप्रकरणी महादेव देवकाते याचा जबाब नोंदवून जर त्यांची बैठक झाली असेल तर रोहित पवारांना याप्रकरणी आरोपी करायला हवं. या प्रकरणी ३०७चं कलम लावलं पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करता येते का, याचा विचार पोलिसांनी करावा. रोहित पवारांना मी आवाहन करतो की तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांमध्ये कशाला भांडण लावताय. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही समोर या. तुम्हाला मला मारायचं असेल तर मला सांगा मी बारामतीत कधी येऊ. त्यांनी तारीख सांगावी, वेळ सांगावी आणि ठिकाण सांगावं मी तिथे येतो”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.