हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये, घरीच योग करावा; गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना हिंदू मुलींना जिममध्ये न जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू मुलींना जिममध्ये न जाण्याचा सल्ला दिला. कॉलेजला जाणाऱ्या हिंदू मुलींना सल्ला देत ते म्हणाले की, मुलींनी जिमला जाऊ नये. त्यांनी घरीच योग करावा. तुम्हाला माहीत नाही की तिथे कोण प्रशिक्षण देत आहे आणि कोणता कट रचला जात आहे असे गोपीचंद पडळकर म्हणाले. पडळकरांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार गोपीचंद यांनी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एका जाहीर सभेत हे वक्तव्य केले आहे. हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये, घरीच योग करावा. त्यांना माहीत नाही की एक मोठा कट रचला जात आहे असे गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत सांगितले की, ‘ते’ हिंदू मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
वाचा: एकाच वेळी 24 तृतियपंथींनी घेतलं विष! तपासात जे समोर आले त्याने पोलिसही हादरले
भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
गोपीचंद यांचा इशारा एका विशिष्ट समुदायाकडे होता. त्यांनी सांगितले की, हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी अशा जिममध्ये जाऊ नये, जिथे त्यांना प्रशिक्षक कोण आहे हे माहीतच नाही. कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी जिममध्ये जाण्याऐवजी घरी योग करावा. त्यांनी अशा ठिकाणांपासून सावध राहावे, जिथे जिम प्रशिक्षक कोण आहे हेही माहीत नाही.
कॉलेजच्या मुलींनी जिममध्ये न जाण्याचा सल्ला
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यामागे एक मोठा कट असल्याचा इशारा दिला. त्यांनी कॉलेजला जाणाऱ्या तरुणांची ओळख तपासण्याची मागणी केली आणि सांगितले की, ज्यांच्याकडे ओळखपत्र नाहीत अशा तरुणांची देखील तपासणी झाली पाहिजे. अशा लोकांना कॉलेजमधील प्रवेशावर बंदी घालावी. यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधक यंत्रणा तयार करावी लागेल. तेव्हाच अशा घटनांना आळा घालता येईल. भाजप आमदाराच्या या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे आणि राजकीय गदारोळही होऊ शकतो. विरोधी पक्ष यावरून भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात.
