AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार महेश लांडगेंच्या मुलीचं आळंदीत झटपट लग्न, गुन्हा दाखल झाल्यानंतर वधू-वराकडील मंडळींची धावपळ!

सर्व बडेजावपणा बाजूला ठेवून लांडगे यांनी आपल्या मुलीचं लग्न आज आळंदीत लावून टाकलं आहे. या विवाह सोहळ्याचे दोन फोटो समोर आले आहेत.

आमदार महेश लांडगेंच्या मुलीचं आळंदीत झटपट लग्न, गुन्हा दाखल झाल्यानंतर वधू-वराकडील मंडळींची धावपळ!
आमदार महेश लांडगे यांच्या मुलीचे आळंदीमध्ये लग्न
| Updated on: May 31, 2021 | 9:51 PM
Share

पिंपरी-चिंचवड : भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार आणि पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी साक्षीच्या मांडव टहाळीच्या कार्यक्रमात कोरोना नियम पायदळी तुडवून झालेल्या नाचगाण्यामुळे लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर अखेर सर्व बडेजावपणा बाजूला ठेवून लांडगे यांनी आपल्या मुलीचं लग्न आज आळंदीत लावून टाकलं आहे. या विवाह सोहळ्याचे दोन फोटो समोर आले आहेत. (BJP MLA Mahesh Landages daughters wedding in Alandi)

लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगेचं येत्या 6 जून रोजी लग्न होणार होतं. या लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटल्याचं एका व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र, या कार्यक्रमात आमदार लांडगे यांच्यासह एकाच्याही तोंडावर मास्क नव्हता. ना या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं. त्यामुळे कोरोना नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महापालिका अधिकाऱ्याचाही डान्स व्हिडीओ

आमदार महेश लांडगे बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर हे आमदार लांडगे यांच्यासोबत नृत्य करताना दिसत आहेत. आमदारांच्या कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत इतरांनीही नृत्य केलं. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी देखील सहभागी होते. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार आणि अधिकारी दोघांवर आता टीकेची झोड उठत आहे.

कोण आहेत महेश लांडगे?

महेश लांडगे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात 2017 मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश राजकारणापूर्वी पैलवान म्हणून महेश लांडगे यांची ओळख

संबंधित बातम्या : 

VIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य

Pune Lockdown Update : पुण्यातील लॉकडाऊन शिथिल, सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु

BJP MLA Mahesh Landages daughters wedding in Alandi

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.