AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लव्ह जिहाद होत असेल तर…अनिल बोंडे यांच्या मागणीने खळबळ; म्हणाले कायदा असा करा की…

लव्ह जिहाद ही संघटित गुन्हेगारी आहे, असा दावा करत अनिल बोंडे यांनी मोठी मागणी केली आहे. धर्मांतर हे राज्याच्या परवानगीनेच झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली.

लव्ह जिहाद होत असेल तर...अनिल बोंडे यांच्या मागणीने खळबळ; म्हणाले कायदा असा करा की...
love jihadImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 21, 2026 | 3:39 PM
Share

Love Jihad : पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे एक प्रेम प्रकरण समोर आले आहे. या प्रेमपकरणात मी माझ्या मर्जीने संबंधित मुलासोबत गेले आहे, असं मुलीकडून सांगितलं आहे. परंतु तरीदेखील या प्रकरणाला लव्ह जिहादचा संदर्भ जोडला जात असून त्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे, असे दावा मुलीच्या कुटुंबीयांकडून केला जातोय. हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले आहे. असे असतानाच आता भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

काय म्हणाले अनिल बोंडे?

लव्ह जिहाद ही संघटित गुन्हेगारी आहे. अहमदनगरमधील घटना अपवादात्मक नाही. लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी राज्यसभेत खाजगी विधेयक आणले आहे. एक मुलगा तसेच त्याचे संपूर्ण कुटुंबीय खोट्या ओळखीच्या माध्यमातून मुलींना फसवतात. प्रेमाच्या जाळ्यात ओढून ड्रग्सच्या मदतीने, प्रलोभन देऊन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न केलं जातं. मुस्लिमांची संख्या वाढते आहे. हिंदूंची संख्या कमी होते आहे. मुस्लिमांची संख्या वाढवण्यासाठी विशेषता मुलींना टार्गेट केलं जात आहे, असा मोठा आरोप अनिल बोंडे यांनी केला.

भाविकांच्या मुलींना जाळ्यात अडकविण्याचं काम केलं

छागुर बाबा बाबा प्रकरणात ईडीन शंभर कोटी रुपये जप्त केले. छागुर बाबाने बाबा असल्याचे दाखवत त्याच्या PA, ड्रायव्हरच्या मुलीपासून ते तिथे येणाऱ्या भाविकांच्या मुलींना जाळ्यात अडकविण्याचं काम केलं. हे जाळं संपूर्ण देशभर होतं. अमरावती बडनेरा लव्ह जिहादच हब झालेले आहे. मेळघाटातील आदिवासी मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या चांगल्या घरच्या मुली यांना या जाळ्यात फसवलं जातं, असाही दावा अनिल बोंडे यांनी केला.

धर्मांतर होत असेल तर…

आंतरधर्मीय विवाह केला जात असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्ट करून मुलींच्या पालकांना याबाबत कळवलं पाहिजे. मुलगी सज्ञान असली तरी स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये लग्नाच्या पूर्वी किंवा लग्नाच्या नंतर धर्मांतर होत असेल तर धर्मांतर करण्याची परवानगी ही राज्य शासनाची असली पाहिजे. राज्य शासनाला सांगूनच धर्मांतर झालं पाहिजे, अशी मोठी मागणीही बोंडे यांनी केली.

दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे

खोटी ओळख देऊन प्रलोभन देत ब्लॅकमेलिंग करून विवाह होत असतील आणि मॅरेज बिरोच्या माध्यमातून विवाह लावण्याचा प्रयत्न होत असेल दोषी आढळल्यास किमान दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. तेव्हाच लव्ह जिहादचे प्रकार थांबू शकतील, असे मत बोंडे यांनी व्यक्त केले.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...