Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya | 400 कोटीला मारा गोळी, सोमय्या मुलाच्या कनेक्शवर बॅकफूटवर? तो छोटा प्रोजेक्ट असल्याचा दावा

नील ज्या कंपनीत आहे, तो एक दोन वर्षांपूर्वी त्या कंपनीशी जोडला गेला. तो तर अगदी छोटा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला नील आणि किरीटला जेलमध्ये टाकायचंय. चला मी येतो.. खोल्या सॅनिटाईज नसतील तरी चालतील, असंही सोमय्या म्हणाले

Kirit Somaiya | 400 कोटीला मारा गोळी, सोमय्या मुलाच्या कनेक्शवर बॅकफूटवर? तो छोटा प्रोजेक्ट असल्याचा दावा
नील सोमय्या आणि किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 10:44 AM

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमय्यांनी थेट राजधानी दिल्ली गाठून प्रेस कॉन्फरन्स घेतली. मात्र मुलाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या बॅक फूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. 400 कोटीला मारा गोळी, तो छोटा प्रोजेक्ट आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

नील ज्या कंपनीत आहे, तो एक दोन वर्षांपूर्वी त्या कंपनीशी जोडला गेला. तो तर अगदी छोटा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला नील आणि किरीटला जेलमध्ये टाकायचंय. चला मी येतो.. खोल्या सॅनिटाईज नसतील तरी चालतील.. पोलिसात तक्रार करायला गेलो, तर तुमचे गुंड आले.. मी कागद देतोय ना, असंही किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्यांचं तत पप झालं

दरम्यान, राऊत यांनी काल आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांना आज पत्रकारांनी सोमय्या यांना विचारले की, पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाची पार्टनरशिप आहे की नाही? पत्रकारांच्या या प्रश्नावर सोमय्यांचं आज पुन्हा तत पप झालं. त्यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला. यावेळी सोमय्या यांनी ही गोष्ट सावरुन नेत पीएमसी बाँकेतील घोटाळ्याशी आमचा दमडीचा संबंध नाही असं सांगितलं. सोमय्या म्हणाले की, आम्ही त्या बँकेतून एक पैसासुद्धा घेतलेला नाही. ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलतायत तो कोणाचा माणूस आहे ते येत्या काही दिवसात समोर येईल. राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. हे मी पुन्हा एकदा सांगतो. उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. डीएचएफल घोटाळा पण आम्हीच बाहेर काढला. तरीही तर संजय राऊत यांच्याकडे याच्याशी सबंधित डॉक्यूमेंट होते किंवा आहेत तर त्यांना ईडीने इतक्या वेळा बोलवलंय तेव्हा द्यायला हवे होते, ते आताही देऊ शकतात.

रश्मी ठाकरेंवरही आरोप

संजय राऊत यांनी कर्जतच्या जमिनीच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.यासंदर्बात किरीट सोमय्या यांनी भाष्य केलं आहे. मी कर्जतला गेलो. तिथे चौकशी केली. श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असून रश्मी यांचा भाऊ आहेत. ती जमीन आधी सलीमच्या नावे ट्रान्सफर झाली. हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे, आणि मग पाटणकरांच्या नावावर झाली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

श्रीधर पाटणकर हे का बोलत नाहीत. श्रीधर पाटणकर याच्या नावावर जमीन सलीम याच्या नावावरुन ट्रान्सफर झाली आहे. मी तक्रार दिलेली नाही. मी फक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली, असं किरीट सोमय्या म्हणाले.

कोविड घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत एका शब्दानं बोलत नाहीत. यासंदर्भातील कागदपत्र मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. पुण्यात कंपनी ब्लॅकलिस्ट करुन त्यांना कंत्राट देणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. मूळ मुद्दा कोविड घोटाळ्याला ठाकरे सरकार आणि संजय राऊत प्रचंड घाबरलेले आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.

सोमय्यांचा निकॉन प्रकल्पाची चौकशी करा : राऊत

निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली, तर त्यावर कारवाई होईल. आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे की याची ताबडतोब चौकशी करा, नील सोमय्याला अटक करा. राऊत पुढे म्हणाले की, मुळात पीएमसी घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? हा भ्रष्टाचाराशी लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा, असा टोलाही राऊतांनी सोमय्या यांना लगावलाय. तसंच देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी राऊत यांनी केलीय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राचं डोकं गरगरलं! सोमय्या म्हणतात, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत तेच चोरीला ! कसे?

जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना? 19 बंगल्यावरून राऊतांना किरीट सोमय्यांचा सवाल, पुरावेच दिले

'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.