जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना? 19 बंगल्यावरून राऊतांना किरीट सोमय्यांचा सवाल, पुरावेच दिले!

संजय राऊत यांचा रोष नेमका कुणावर आहे, असा सवाल करत किरीट सोमय्या यांनी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत 19 बंगल्यांसंबंधीचे पुरावे सादर केले. अलिबागजवळील 19 बंगले ठाकरे कुटुंबियांच्या नावावर असल्याचे त्यांनी सांगितले.

जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना? 19 बंगल्यावरून राऊतांना किरीट सोमय्यांचा सवाल, पुरावेच दिले!
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 10:34 AM

नवी दिल्ली| शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) हे दलाल असून ते सतत इतरांना धमकावण्याचे काम करतात, असा आरोप केला होता. ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचे अलिबागजवळ 19 बंगले असल्याचं मुलुंडच्या दलालाने (किरीट सोमय्या) सांगितलं, जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. तसंच असे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्याने मारू असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. दरम्यान, काल किरीट सोमय्या दिल्लीकडे रवाना झाले होते. ते या आरोपांना कसे सामोरे जातात, याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. किरीट सोमय्या यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन 19 बंगल्यांचे पुरावे पत्रकारांसमोर सादर केले. तसेच हे पुरावे मी याआधीदेखील पत्रकारांसमोर ठेवले होते, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्यांनी दाखवले पुरावे

संजय राऊत यांना रोष नेमका कुणावर आहे, असा सवाल करत किरीट सोमय्या यांनी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत 19 बंगल्यांसंबंधीचे पुरावे सादर केले. तसेच पक्षाचे लोक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देत नसल्याने ते असे बोलतायत, असा टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला. किरीट सोमय्यांनी दाखवलेल्या कागद पत्रातील मजकूरही वाचून दाखवला. ते वाचताना म्हणाले, रश्मी उद्धव ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला या 19 बंगल्याचा प्रॉपर्टी टॅक्स कोंडल ग्राम पंचायतला भरला. रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर.. हा टॅक्स त्यांनीच भरला आहे. ‘

जोडे रश्मी ठाकरेंना मारणार?

किरीय सोमय्या यांनी संजय राऊत यांना उलट सवाल केला. ते म्हणाले,’ हे बंगले किरीट सोमय्यांच्या नावे नाही तर रश्मी ठाकरे यांच्या नावाने आहेत, रश्मी उद्धव ठाकरे यांनी 2019-20 वर्षासाठीचा हा टॅक्स भरला. त्याआधीचा टॅक्स 12/11/2020 ला अन्वय नाइकच्या नावाने होता. हा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरलाय. किरीट सोमय्याने नाही. संजय राऊत साहेब, आपण जोड्याने कुणाला मारणार? 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंत 19 बंगल्याचा घरपट्टी, दिवबत्ती कर, आरोग्य कर हा रश्मी उद्धव ठाकरे यांच्या अकाउंटमधून डायरेक्ट आरटीजीएस केलेला दिसतोय. अन्वय नाइक आणि उद्धव ठाकरे यांचे जमिनीसंबंध किरीट सोमय्याने खुलासा केला होता. त्यानंतर हे प्रॉपर्टीचे व्यवहार झाले आहेत.’ असे पुरावे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत कालच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते, अलिबाग जवळील कोरलाई गावात ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले बांधून ठेवल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे. मात्र ती बेनामी प्रॉपर्टी आहे. माझं आव्हान आहे, त्या माणसाला आणि आपल्या सगळ्यांना. मी सांगतोय आपण चार बसेस करू आणि त्या 19 बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ. सगळ्या पत्रकारांनी पिकनिक काढू जर तुम्हाला बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन’ ….असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

इतर बातम्या-

महाराष्ट्राचं डोकं गरगरलं! सोमय्या म्हणतात, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत तेच चोरीला ! कसे?

BEST Bus | मुंबईची दुसरी लाईफलाईन प्रवाशांसाठी ‘काळ’, पाच वर्षांत ‘बेस्ट’चे 97 जीवघेणे अपघात, मृतांचा आकडा किती?

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.