AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा
भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 28, 2026 | 6:59 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या काही जागा अशा आहेत, त्या जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. दरम्यान महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच आता भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अमरावती विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघातून भाजपने  प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.  राज्याचे महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते उद्या दुपारी १.४५ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्यातील १७ पैकी १४ मतदारसंघांत भाजप बहुमतात असल्याने ते ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत आहेत. दरम्यान भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला 4 जागांची ऑफर देण्यात आली आहे, परंतु शिवसेना शिंदे गट 6 जागांच्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळे अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये.

जागा वटपाचा तिढा कायम असतानाच भाजपकडून आता आपला पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अमरावती विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवरून महायुतीमधील पक्षांमध्ये  सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील विधान परिषदेच्या सर्वच जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक 7 ते8 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला 5 ते 6 जागा येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तीन ते चार जागांवर आपले उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे, ते विधान परिषदेच्या सर्व जागा लढवतील परंतु मला नाही वाटत महाविकास आघाडी एकही जागा जिंकेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला