AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pooja chavan suicide | स्थानिक कार्यकर्ते नाराज, नेतृत्व संपवण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप, सरपंचाचा भाजपला रामराम

भाजपच्या सदस्य असलेल्या तसेच बीडमधील काळवंटी तांडा गावाच्या सरपंच असलेल्या कमल चव्हाण (Kamal Chavana) यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

pooja chavan suicide | स्थानिक कार्यकर्ते नाराज, नेतृत्व संपवण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप, सरपंचाचा भाजपला रामराम
महिला सरपंचाचा भाजप सदस्यत्वाचा राजीमाना
| Updated on: Feb 16, 2021 | 11:34 PM
Share

बीड : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यांनतर भाजपने हा मुद्दा लावून धरला आहे. भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेतृत्व आणि बंजारा समाजातील उच्चपदस्थ मंत्री संजय राठोड यांना संपविण्याचे भाजपकडून कटकारस्थान केल्याचा आरोप होतोय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून होतोय. याच नाराजीमुळे भाजपच्या सदस्य तसेच बीडमधील काळवंटी तांडा गावाच्या सरपंच असलेल्या कमल चव्हाण (Kamal Chavana) यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (bjp sarpanch Kamal Chavana in beed district given resignation of bjp Membership)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे राठोड यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली आहे. तसेच, राजीनामाच नाही, तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील काही घटकाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी उघडपणे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.  संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बीडमधील काळवंटी तांडा गावच्या भाजप संरपंचानी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. यावेळी त्यांनी आपल्या राजीनाम्यात भाजपकडून ओबीसी आणि बंजारा समाजाचे नेतृत्व संपवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला आहे.

कमल चव्हाण यांचा राजीनामा

संजय राठोड यांचा राजीनामा?

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचं कळतंय.

भाजप कार्यकर्त्याचेही राजीनामे, पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे

पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचं: दीपक केसरकर

Pooja Chavhan case : पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार

(bjp sarpanch Kamal Chavana in beed district given resignation of bjp Membership)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.