लातूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजपची ‘एन्ट्री’ ; चुरस वाढणार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 74 जणांनी आपले 117 अर्ज हे दाखल केले आहेत. यंदा प्रथमच भाजपाने या निवडणूकीत पॅनल उभे केले असल्याने रंगत वाढणार आहे. तर आतापर्यंत जिल्हा बॅंकेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे.

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजपची 'एन्ट्री' ; चुरस वाढणार
लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक

महेंद्र जोंधळे लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (latur District Bank) संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 74 जणांनी आपले 117 अर्ज हे दाखल केले आहेत. यंदा प्रथमच भाजपाने या निवडणूकीत पॅनल उभे केले असल्याने रंगत वाढणार आहे. तर आतापर्यंत जिल्हा बॅंकेवर (Congress) काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे या निवडणूकीत काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अनेकवेळी ही निवडणूक बिनविरोध निघाली असून यावेळी भाजपा प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला कशी टक्कर देणार हे पहावे लागणार आहे. 19 संचालकासाठी 21 नोव्हेंबरला मतदान प्रक्रीया ही पार पडणार आहे.

जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपा हे प्रतिस्पर्धी असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीच केव्हाच समोरासमोर आलेले नव्हते. त्यामुळे बॅंकेची निवडणूक ही बिनविरोधच झालेली आहे. शिवाय माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीच बॅंकेची वाटचाल राहिलेली आहे. तर सहकार महर्षी यांना लोकशाही मान्य असेल तर त्यांनी ही निवडणूक लोकशाही पध्दतीनेच होऊ देण्याचे अवाहन भाजपचे आमदार रमेश कराड यांनी केले आहे.

अर्ज छाणनीमध्ये अडवणूक न करता मतदारांना मतदानाचा हक्क बजावू देण्याचेही त्यांनी अर्ज दाखल करताना सांगितलेले आहे. आतापर्यंत ही जिल्हा बॅंक काँग्रेसच्या ताब्यात राहिली असली तरी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सहकार पॅनलचे 19 जागेसाठी 34 अर्ज

सहकार पॅनल हा माजी मंत्री दिलीपराव देशमुख व पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे. या पॅनलकडून 19 जागांसाठी 34 अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. सोमवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी होती.

काँग्रेसकडून यांनी दाखल केले अर्ज

काँग्रेसकडून यावेळी प्रथमच आ. धिरज देशमुख, बाबासाहेब पाटील, माजी आ. वैजिनाथ शिंदे, त्रिंबक भिसे, राज्य महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विद्यमान चेअरमन श्रिपतराव काकडे, संचालक अशोकराव पाटील- निलंगेकर तर शिवसेनेचे संतोष सोमवेशी यानी अर्ज दाखल केले आहेत.

दिलीपराव देशमुख यांच्या जागी आ. धिरज देशमुख

आ. धिरज देशमुख यांची देखील जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यावेळी एन्ट्री होत आहे. यापूर्वी या सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे निवडणूक लढवत होते. यंदा मात्र, त्यांनी पुतण्याला संधी दिली असून ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार आहेत. आतापर्यंत दिलीपराव देशमुख हे बिनविरोधच निवडून आलेले आहेत तीच परंपरा आ. धिरज देशमुख कायम ठेवणार का हे पहावे लागणार आहे.

शिवसेनेचीही होऊ शकते ‘एन्ट्री’

काँग्रेसच्या खांद्यावर बसून यावेळी शिवसेनेचीही जिल्हा बॅंकेत एन्ट्री होऊ शकते. शिवसेनेचे संतोष सोमवंशी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा बॅंकेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून यंदाच्या निवडणूकीच काय होणार हे पहावे लागणार आहे. (BJP’s entry in Latur district bank elections to be tight)

इतर बातम्या :

VIDEO: सत्ता गेल्यावर काहींना भ्रमिष्टपणा येतो, काहींचा तोल जातो; जयंत पाटील यांचा चंद्रकांतदादांना टोला

सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक

सहकाराच्या मुद्द्यावर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक सकारात्मक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI