
Uddhav Thackeray : राज्यात एकूण 29 महापालिकांचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. मुंबई महापालिकेत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ही निवडणूक जिंकण्यासाठी येथे शिवसेनेचा ठाकरे गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि मनसे या चार पक्षांनी चांगला जोर लावला होता. काहीही झालं तरी आपलीच सत्ता आली पाहिजे, हा विचार मनात ठेवून या पक्षांनी रणनीती आखली होती. परंतु येथे आता भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची महायुती वरचढ ठरली आहे. आता ठाकरेंचा मुंबई पालिकेवरील 25 वर्षांचा सत्तेचा बुरूज ढासळला आहे. त्यामुळेच आता ठाकरे यांची ताकद कमी झाली आहे का? त्यांची मुंबईवरील पकड ढिली पडली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वूमीवर सध्या समोर आलेल्या निकालाचा नेमका परिणाम काय? तसेच या निकालामुळे कोणाला फटका बसला आणि ठाकरेंचे मुंबईतील स्थान काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
मुंबईत एकूण 277 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. ही निवडणूक एकनाथ शिंदे आणि भाजपा यांनी एकत्र लढवली. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज टाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र येत मुंबई जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु ठाकरे बंधूंना यश आले नाही. आतापर्यंतच्या कलानुसार भाजपाचा 97 जागांवर विजय झाला आहे. शिंदे यांच्या भाजपाला 30 जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांच्या मिळून 127 जागा होत आहेत. म्हणजेच या दोन्ही पक्षांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचा 15 जागांवर विजय झाला आहे. मनसेला 9 जागांवर तर उद्धव ठाकरे यांना 64 जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आणि इतरांचा 11 जागांवर विजय झाला आहे.
Maharashtra Election Results 2026 : 17 पैकी 16व्या प्रभागात तीनही जागा काँग्रेसला
Maharashtra Election Results 2026 : पराभवानंतर अजित पवारांची पहिली मोठी प्रक्रिया..
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
सांगली महापालिकेतील फायन आकडा घ्या जाणून
सातारकरांनी अनुभवली खासदार उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांची मैत्री
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई पालिकेची निवडणूक फार महत्त्वाची होती. शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्यासोबत अनेक मंत्री, आमदार गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला. मुंबईतील बड्या नेत्यांचाही यात समावेश होता. त्यामुळेच शिंदे यांच्यासोबत नेते, मंत्री यासोबतच स्थानिक पदाधिकारीही गेले असे राजकीय जाणकार सांगायचे. परंतु आताच्या निकालाने हे दावे फोल ठरवले आहेत. कारण शिवसेनेचे विभाजन झालेले नसताना या पक्षाने 2017 साली 84 नगरसेवक निडवून आणले होते. आता मात्र शिवसेनेचे दोन तुकडे झालेले असूनही उद्धव ठाकरे यांनी एकहाती 64 नगरसेवक निवडून आणले आहेत.
म्हणजेच एकट्या उद्धव ठाकरे यांची मुंबईतील ताकद अजूनही कमी झालेली नाही, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्याकडे मुंबईत गमावण्यासारखे काहीही नव्हते. त्यांचे साधारण 9 नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणजे राज ठाकरे यांनाही फायदाच झाला आहे. शिंदे सोबत नसताना भाजपाचे 2017 साली 82 नगरसेवक निडवून आले होते. यावेळी विजयी नगरसेवकांचा आकडा हा 97 आहे. म्हणजेच भाजपाच्या शिंदे यांच्यासोबतच्या युतीमुळे ठाकरे यांना फारसा फटका बसलेला नाही. काँग्रेसच्या जागा मात्र कमी झालेल्या आहेत.