AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026 Result : ठाकरे बंधुंना मुंबईकरांनी का नाकारलं? बावनकुळेंनी दिलं एका वाक्यात उत्तर

BMC Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या या विजयावर आणि मुंबईतील ठाकरे बंधुंच्या पराभवावर भाष्य केले आहे.

BMC Election 2026 Result : ठाकरे बंधुंना मुंबईकरांनी का नाकारलं? बावनकुळेंनी दिलं एका वाक्यात उत्तर
Thackeray lost in BMCImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 3:07 PM
Share

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपने शानदार कामगिरी केली आहे. बहुतांशी महापालिकांवर भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या या विजयावर आणि मुंबईतील ठाकरे बंधुंच्या पराभवावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महायुतीला दोन तृतियांश बहुमत मिळणार

भाजपच्या विजयाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘डबल इंजिन सरकार म्हणजे मोदीजींचं सरकार, देवेंद्रजींचे सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, विकसित महाराष्ट्र बनवू शकतं, ग्रामीण भागातूनही असाच निकाल मागच्या वेळी आला होता. मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, विकासाचं मत आहे. सध्या हाती आलेला कल आता असाच सुरू राहील आणि महायुती दोन तृतियांश बहुमताने आणि 51 टक्के नगरसेवकांसह भाजप विजय मिळवले असं मला वाटतं.

मुंबईत ठाकरेंना मतदारांनी का नाकारलं ?

मुंबईत ठाकरेंना मतदारांनी का नाकारलं यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘या पराभवाचं एकच कारण आहे. या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचं व्हिजन,एकनाथ शिंदे आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकारवर सरकारने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.’ दरम्यान या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यांच्यासोबत होती. मात्र या आघाडीला आता मुंबईकरांनी नाकारल्याचे समोर आले आहे.

मुंबईकरांची महायुतीला साथ

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सरशी पहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेने 130 जागांवर आघाडी घेतली आहे. यातील काही उमेदवार विजयी झाले आहेत. तर ठाकरे बंधू हे 71 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेत भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. कल्याण डोंबिवलीतही भाजप आणि शिवसेना आघाडीवर आहे. तर नाशिकमध्येही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यातील बहुतांशी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकताना दिसणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...