
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा आजपासून झंझावात सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्याच्या मुंबईत 6 पेक्षा अधिक सभा होणार असून अनेक ठिकाणी रोड शोचेही आयोजन करण्यात आलं आहे. आज वरळीत फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचा सहभाग, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी आहे. जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाल्याने लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 649 उमेदवार रिंगणात आहेत, एकूण 269 उमेदवारांनी माघार घेतली. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी तुम्हाला इथे वाचायला मिळतील. त्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटले की, शिवसेने शिवाय पुण्याचा महापौर होणार नाही, असं पुण्याचं चित्र असणार आहे. कोयता गँगमुक्त पुणे शहर करू असं जे बोलणारे आहेत त्यांनीच गुन्हेगारांना तिकीट दिले आहे, त्यांच्या बोलण्यात मोठी विसंगती आहे असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. पुण्यात भाजप शिवसेना युती का होऊ शकली नाही तो आता इतिहास झाला आहे असंही शिवतारे यांनी म्हटले आहे.
जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी जालन्यातील गो वंश तस्करांची परेड घेतली.36 गो वंश तस्करांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जालना पोलिसांनी या गोवंश तस्करांवरकडून प्रत्येकी 25 हजारांचे बंदपत्र लिहून घेतले आहे.पुन्हा गुन्ह्यात सापडल्यास MPDA अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षकांचा गो वंश तस्करांना इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये सावत्रीबाई वाणी यांना मशाल चिन्ह न मिळाल्याने त्या कोर्टात गेल्या होत्या. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने त्यांना मशाल चिन्ह देण्याचे ठरले मात्र आता पुन्हा चिन्ह नाकारण्यात आले आहे. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, मशाल चिन्हाचा एबी फॉर्म आम्ही दिला आहे. आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने म्हटले आहे चिन्ह द्यायला पाहिजे दुपारी तशी घोषणा देखील झाली. महापालिकेच्या लीगल आडव्हायजर यांच पत्र आले. कोर्टाचा निर्णय बदलू पाहत आहेत. असा पक्षपाती केल्यास आम्ही आंदोलन करू.
नांदेड महानगरपालिकेसाठी शिवसेना व राष्ट्रवादीने 33 जागांवर युती केली आहे. नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत. नांदेड उत्तरमध्ये या पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर व शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूकीत निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश अजित पवारांच्या हस्ते होणार आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायत मुंथुर येथे रोशन कुळे यांच्या किडनी प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या किडनीचा हिशोब मागण्यासाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तब्बल 11 किलोमीटरची पायी यात्रा काढत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
जालना महापालिकेत 65 पैकी आमच्या 45 जागा निवडून येतील अशा विश्वास भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकतीने उतरला असून आम्ही सक्षम उमेदवार दिलेले आहेत. निकाल लागल्यानंतर जालना शहरातील जनता ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात देईल असेही दानवे यांनी म्हटले आहे.
मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणातील तीन आरोपींना 4 दिवसांची तर एका आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांना 2 दिवसांची तर आतिश शिंदे, अमर शिंदे, तानाजी शिंदे या तीन आरोपीना 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून सोलापुरातील जोशी गल्ली येथे भाजपच्या दोन गटात मोठे वाद झाले होते. शिंदे आणि सरवदे कुटुंबात झालेल्या वादात मनसेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती.
जालन्यात रविवारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. तसेच परवा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पार पडणार आहे.
रावसाहेब दानवे यांच्यासह स्थानिक आमदार आणि नेते उपस्थित राहणार आहेत.
पुणे महापालिका क्षेत्रफळानुसार मोठी आहे. निधीची कामतरता नसतात देखील सर्वसामान्य पुणेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुणे महापालिका नागरिकांना सोयी सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.
सांगलीकरांनी फक्त कमळाची चिंता करावी. तुमची पुढचे 5 वर्ष आमच्यावर चिंता सोडून द्या. सांगली महापालिकेमध्ये सत्ता द्या,विकासासाठी पैशाची कमतरता पडू देणार नाही,असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगलीकरांना दिलं आहे. सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीत पार पडला. यावेळेस फडणवीस बोलत होते.
पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. दादांनी या पत्रकार परिषदेदरम्यान अनेक मुद्द्यांवरुन भाष्य केलं. “पुण्यात भाजपा 2017 ते 2022 सत्तेत असताना जो कारभार झालाय तो लक्ष्यात आला पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत मतदार वेगळा विचार करत असतात, असं दादा म्हणाले. तसेच पिंपरी- चिंचवड महापालिकेत आमची सत्ता असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागले, असंही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
चंद्रपूर : संजय राऊत यांनी बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांबाबत केलेल्या वक्तव्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे नकारात्मक मानसिकतेचे आहेत, ते समाजात नकारात्मक गोष्टी पसरवत असतात. 3 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्याच्या ऑफिस आवारात जे उमेदवार येतात त्या सर्वांचे अर्ज स्वीकारण्याची पद्धत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच आमचा विकास करू शकते या अजेंड्यावर फॉर्म वापस घेण्यात आले. कोणीही कोणावर दबाव टाकू शकत नाही, असे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सहा दिवसाआधी नागपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांच्या विरोधात नकली नोटांबाबत आरोप केले होते. याच आरोपानंत आता वडेट्टीवार यांच्याविरोधात गुन्हा तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील नवले ब्रिज परिसरात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. या अपघातात चोघेजण जखमी झाले आहेत.
कंटेनर आणि खासगी वाहनात हा अपघात झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
परळी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी आज आ.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.यावेळी आ.धनंजय मुंडे यांनी नगर परिषद कामकाजासाठी लागणारे साहित्य असणारे कीट नगराध्यक्षा आणि नगरसेवकांना दिले.नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ मुंबई नाका येथे दाखल
मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सरोज आहेर , माजी खासदार समीर भुजबळ ,आमदार पंकज भुजबळ राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या उमेदवारांची देखील मोठी गर्दी
शस्त्रक्रियेनंतर मंत्री छगन भुजबळ आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये कार्यक्रमाला उपस्थित
मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना-काँग्रेसची छुपी युती
नरेंद्र मेहतांचा प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप
प्रताप सरनाईकांचा भाईजान असा आमदार नरेंद्र मेहेतांनी केला उल्लेख
नरेंद्र मेहतांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
धाराशिव -जिल्हा परिषद आली काय? गेली काय? आम्हाला त्याचं काही नाही परंतु गद्दाराला ठेचल्याशिवाय सोडायचं नाही अशा शब्दात माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षांतर्गत गद्दारी करणाऱ्याला खडे बोल सुनावले आहेत. एवढेच नही तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी करणाऱ्याला ठेचून काढा असे आदेशच थेट सावंत यांनी यावेळी दिले.
राज्यात भाजपाचं तिकीट वाटप चांगलं चर्चेत राहिलंय. अनेक ठिकाणी तिकीट वाटपावरून झालेला मोठा गोंधळ, रडारड आणि त्यावरून झालेला राडा राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. तर अनेक ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेले उपरे आणि मोठ्या नेत्यांच्या कुटूंबात दिलेल्या तिकिटावरूनही भाजपवर मोठी टीका झाली. मात्र, अकोल्यात भाजपाने दिलेल्या एका तिकिटाची जोरदार चर्चा शहरात होत आहे. अकोल्यात भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर ‘मंगेश झिने’ या अत्यंत सर्वसामान्य घरातील गरीब तरुणाला उमेदवारी दिली आहे. मंगेश हा गेल्या दहा वर्षांपासून खडकी भागात महावितरण (वीज) बिल वाटपाचं काम करतो. त्याची आई लोकांच्या घरी धुणीभांडी करते. तर यासोबतच त्याचे वडील हे चौकीदारी करतात.
जिल्हा परिषदेचे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकले. धाराशिवमध्ये तानाजी सावंत मोठ्या ताकतीने जिल्हापरिषद मैनादात उतरले आहेत. तानाजी सावंत यांचा वाशी तालुक्यात विजय संकल्प मेळावा, मेळाव्यासाठी दीड ते दोन हजार गाड्या. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक मेळाव्यासाठी दाखल.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायत मुंथुर येथे रोशन कुळे यांच्या किडनी प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या किडनीचा हिशोब मागण्यासाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज आक्रोश मोर्चा व 11 किलोमीटरची पैदल यात्रा काढण्यात आली. या आक्रोश मोर्चामध्ये दिव्यांग बांधव पण सहभागी झाले आहेत.
मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाले आहेत. सरवदे हत्येच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडी उपोषण करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत मुक आंदोलन करणार आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची कायम चर्चा झाली मात्र पुढे काहीच झाले नाही.मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यावर याला गती आली, असे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले. या भव्य स्मारकाचे भूमिपूजन झाले.आपण जर मुख्यमंत्री नसता तर सावित्रीबाई फुले यांचे स्मारक झाले नसते. याठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले पाहिजे.करण आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालात, असे ते म्हणाले.
पैसे वाटप केल्या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबुराव चांदेरे यांच्या मुलावर बाणेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.चांदेरे यांचा यांचा मुलगा किरण चांदेरे पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी मोठा वाद झाला होता. बाणेर पोलिसांनी चांदेरे यांचा मुलगा किरण चांदेरे याच्यासह चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
काही लोक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. काहींना तर स्क्रिप्ट लिहून देतात, कोणता शर्ट घालायचा, हे सगळं एजन्सी करतात. एजन्सी भाड्यानं घ्यायचं आणि हे सर्व करायचं. पैसा जक्कड आहे न, एखाद्या कंपनी मध्ये शेकडो मुलं बसवायची आणि मी किती पॉप्युलर आहे, हे दाखवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरुयेत. पण आपण आपले पाय जमिनीवर ठेवायचे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.
आज देशभर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमाला देवा भाऊ उपस्थित आहे त्यांचे माझ्या मतदार स्वागत संघात करतो.195 वर्षा आधी जाती पातीचे राजकारण होते.त्यावेळी फुले दांपत्याची शाळा सुरू केली.या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते होत आहे.याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. या तालुक्यात औद्योगीकरण वाढू लागले आहे. या भागात शैक्षणिक हब सुरू झाले तर या भागाला चालना मिळेले, अशी मागणी मंत्री मकरंद पाटील यांनी केली.
मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे.सरवदे हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.दोन दिवसात मनसे नेते अमित ठाकरे सरवदे कुटुंबाच्या भेटीला येणार आहे.भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना आपल्या मुलासाठी हा प्रभाग बिनविरोध करायचा होता. त्यामुळेच त्यांच्याकडून सर्व अपक्ष उमेदवारावर दबाव आणला जात होता. त्यामुळे या प्रकरणात आमदार पुत्र किरण देशमुख यांचीही चौकशी झाली पाहिजे.याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आम्ही माहिती दिलीय पुढील दिशा ते ठरवतील
दोन महिने झाले आॕपरेशन झाले.डॉक्टरांची परवानगी घेऊन आलो. सावित्रीबाई फुलेंना नमन करतो. तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम घेतलात. आता 150 कोटी दिले.देवा भाऊ देता है तो छप्पर फाडके देता है. पुणे फुलेवाड्याच काम रेंगाळले आहे. त्याला जरा स्पीड दिले पाहिजेत. महात्मा फुलेंची 200 वी जयंती मोठी साजरा करणार अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. नायगावचे नाव क्रांती ज्योती सावित्रीबाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ती विचारात घ्यावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदा मोठ्या संख्येने उमेदवार उभे करून निवडणूक लढवत आहे. आम्ही सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिलेली आहे.संजय शिरसाट यांनी उमेदवाराला दिलेल्या संदर्भात आपल्याकडे ऑडिओ क्लिप असून आपण त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत
एसटी बसच्या महिला वाहकाची महिला प्रवाशांसोबत शिवीगाळ. चिल्लर नाहीतर नोटा फाडून देऊ का तुला? वाद झाल्याचे संभाषणातून स्पष्ट. नांदेडच्या अर्धापूर बस स्थानकातील प्रकार. महिला वाहकाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल.
छत्रपती संभाजीनगर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदा मोठ्या संख्येने उमेदवार उभे करून निवडणूक लढवत आहे. आम्ही सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिलेली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक 31 मध्ये इच्छुक असलेल्या शिवा तेलंग यांचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा. सोशल मीडियावर पत्र पोस्ट करून दिला आत्महत्येचा इशारा. आपल्या आत्महत्येला अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विजय करंजकर, सुदाम ढेमसे जबाबदार राहतील, असा पत्रात आशय. महानगरप्रमुख प्रवीण तिदमे पैशांची देवाणघेवाण करून तिकीट वाटल्याचा आरोप. पक्षाकडून प्रभागात दोन जणांना AB फॉर्म देण्यात आल्याने झाला गोंधळ. सोशल मीडियावर पत्र पोस्ट केल्यानंतर शिवा तेलंग नॉट रिचेबल.
चंद्रपूर शहर मनपा निवडणूक घोषित होताच भाजपच्या आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार गटात संघर्षाला सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष उमेदवार निवडीत गोंधळ झाल्याने शहर भाजप अध्यक्षाला पदमुक्त करण्यात आले. उद्या 4 जानेवारीला चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो चं आयोजन करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मनोमिलन घडवत प्रचारासाठी यंत्रणा सज्ज करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपुरात पोहोचत आहेत. बावनकुळे, मुनगंटीवार, पालकमंत्री अशोक उईके, जोरगेवार अशा प्रमुख नेत्यांची बैठक शहरातील ND हॉटेल मध्ये काही वेळात होणार आहे. वादाचे ताजे प्रसंग आणि उमेदवार निवडीत मुनगंटीवार गटाला डावलल्यामुळे ही बैठक वादळी ठरू शकते.
सुट्ट्यांच्या कालावधीत भाविकांकडून साईंच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीत तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपये रकमेचे दान. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माध्यमांना माहिती. नाताळाच्या सुट्ट्या नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान 8 लाखांहून अधिक भाविक साईचरणी नतमस्तक.
निलम गोरे, विजय शिवतारे अन्याय करत असल्याचा महिला आघाडीतील नेत्यांनी आरोप केला आहे. आज महिला आघाडीतील नेत्या सामूहिक राजीनामा देणार आहेत. उमेदवारी देताना विश्वासात न घेतल्याचा महिला आघाडीचा आरोप आहे. चैत्राली गुरव महिला आघाडी शिवसेना उपशहर प्रमुख यांनी माहिती दिली आहे.
आमदार खोसकर यांची कन्या इंदुमती खोसकर प्रभाग 6 मधून निवडणूक लढवत आहे. मखमलाबाद राम मंदिरा पासून प्रचाराला सुरुवात झाली. नाशिकच्या प्रभाग 6 मध्ये ऐतिहासिक विजय होणार… खोसकर यांना मुलीच्या विजयाची खात्री…
महानगरपालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहिता शिथिल होईपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन नाही. शासन परिपत्रकानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा परिपत्रक काढत निर्णय घेतला. 15 डिसेंबर 2025 पासून आचारसंहिता प्रभावात असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी – केडीएमसी प्रशासनाचे आव्हान आहे.
रामकुंडाच्या पात्रामधून गाळ काढायच्या कामाला सुरुवात झाली आहे. राम काल पथ कामाचा भाग म्हणून रामकुंड परिसराचे सुशोभीकरण होणार आहे. सुशोभीकरणापूर्वी संपूर्ण पात्र स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. जेसीबी आणि इतर मशिनरी वापरून स्वच्छ संपूर्ण रामकुंड परिसर आणि रामकुंडाचे पात्र केला जातो आहे
सुकमा जिल्ह्यातील कोटा कीष्टराम जंगल परिसरातील घटना घडली आहे. आज पहाटेपासूनच ऑपरेशन सुरू झाला होता. डी आर जी व सीआरपीएफ पोलिसांच्या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी जंगलात प्रवेश केल्यानंतर माओवादी संघटनेने हल्ला केला. प्रत्युत्तर देत जवळपास दीड तास चकमक सुरु होती. कोटा येथील पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी माहिती दिली.
29 प्रभागात 115 सदस्यांसाठी होत आहे निवडणूक. 833 वैध उमेदवारा पैकी 286 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्या नंतर 547 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार नालासोपारा पूर्व धानिव-पेल्हार प्रभाग समिती एफ मध्ये 116, विरार पूर्व प्रभाग समिती सी मध्ये 109, वसई पूर्व फादरवाडी-गोखीवरे विभागात 108 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
माजी मंत्री डी. पी सावंत व अशोकराव चव्हाण यांचा फोनवरून संवाद व्हायरल. जोंधळे आपले एक हिंदू पॅनल उभ करू अशोक चव्हाण. आपल्याला मुस्लिम उमेदवार नको, तो मते खाऊ शकत नाही माजी मंत्री डी. पी. सावंत एकाच फोनवरून डी. पी सावंत व अशोक चव्हाण यांचा उमेदवार संजय जोंधळे सोबत संभाषण व्हायरल
माजी नगरसेवक विजय काटकर, काँग्रेसचे सलीम काझी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. तिकीट वाटपात अन्याय; निष्ठेला किंमत नाही, पैशाला किंमत असल्याचा आरोप. शिवसेना उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी तिकीट देताना एक ते दोन कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप. तर काँग्रेसमध्ये सन्मान न मिळाल्याने सलीम काझींचा शिंदे गटात प्रवेश….दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षावर ओढले ताशेरे
अजित पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपांचे काय झाले म्हणत संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. सिंचन घोटाळ्याचे काय झाले? अजित पवारांवर 70 कोटींचा आरोप आम्ही केला.
गडचिरोली प्रसूतीसाठी सहा किलोमीटर पायपीट करणाऱ्या गरोदर मातेचा बाळासह मृत्यू झाला. एटापली तालुक्यातील अलदंडी येथील आशा संतोष किरंगा या गरोदर मातेला काल रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या. रस्ते चांगले नसल्यामुळे रुग्णवाहिका जंगल भागात पोहोचत नाहीत, अशा परिस्थितीत या गरोदर मातेने पायपीट करत 6 किलोमीटर प्रवास केला. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पोटातच बाळाचा मृत्यू झाला व काही तासात मातेने अखेरचा श्वास घेतला.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावात सीरिँटिका पवनचक्की कंपनीविरोधात आदिवासी समाजाचे तीव्र आंदोलन सुरू आहे. महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट लाईटच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं. पवनचक्की कंपनीकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा आदिवासी समाजाचा आरोप असून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या पॅम्प्लेटवर भाजप आमदाराचा फोटो . – भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोटो विरोधी पॅनलच्या पॅम्प्लेटवर आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. प्रभाग 7 मधील राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवारांच्या प्रचारातील पॉम्प्लेटवर आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोटो दिसला. सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून 102 उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत.
पुणेै – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाबुराव चांदेरेचा मुलगा किरण चांदेरे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे उमदेवार गणेश कळमकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्री एका महिलेला पकडले, ही महिला प्रभागातील महिलांची नाव लिहून घेत असल्याचे सांगत आहे. महिलेने देखील चांदेरेचे नाव घेतल्याचे समोर आले आहे. बाबुराव चांदेरे यांचा मुलगा किरण चांदेरेसह,सिद्धु कालशेट्टी,राजु चौकीमट परेश मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.