BMC Election 2026 : मुंबईचा महापौर कोण होणार? फडणवीसांची थेट स्टेजवरून घोषणा, म्हणाले काहीही झालं तरी मुंबईचा…
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना मुंबईच्या महापौरपदाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर सभेत महापौरपदाचा सस्पेन्स संपवून टाकला आहे.

BMC Election : सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यंदा राज्यात एकूण 29 महापालिकांची सोबतच निवडणूक होत आहे. परंतु या निवडणुकीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. काहीही झालं तरी निवडणूक जिंकायची असा निश्चय महायुती तसेच ठाकरे बंधूंनी केला आहे. मुंबई जिंकण्यासाठी आता महायुतीकडून मोठ्या सभांचे आयोजन केले जात आहे. आजदेखील (3 जानेवारी) मुंबईत महायुतीची मोठी सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. महायुती निवडणुकीत विजयी झाल्यास महापौर कोण होणार? असे विचारले जात होते. सोबतच उत्तर भारतीयाला या पदावर बसवले जणार, असा दावा ठाकरे बंधूंकडून केला जात होता. आता फडणवीस यांनी महायुतीच्या महापौरपदाबाबतचा संस्पेन्स संपवून टाकला आहे. त्यांनी मुंबईचा महापौर कोण हाणार, याबाबत जाहीरपणे सांगून टाकले आहे.
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली
भाषणात बोलताना फडणवीस यांनी आमदार आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांचे नाव न घेती टीका केली. ” मुंबईच्या निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. या टोळीत काही अबोध बालक आहेत. हे बालक म्हणतात की सगळं आम्हीच काम केलं. ते कोस्टल रोड, मेट्रोची निर्मिती आम्ही केली, असा दावा ते करतात. परंतु जनतेला सगळं माहिती असतं,” असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
प्रत्येक कामात खोडा कोणी घातला?
पुढे बोलताना कोस्टल रोड कोणी केला? बीडीडी चाळीचा विकास कोणी केला? मेट्रोचं काम कोणी केलं? असं मुंबईकरांना अर्ध्या रात्रीजरी विचारलं तरी ते हे सगळं काम महायुतीने केलं, असंच सांगतील. प्रत्येक कामात खोडा कोणी घातला? प्रत्येक कामाला स्थिगिती कोणी केली दिली? हे विचारलं तरी मुंबईकर उद्धव ठाकरे यांचे नाव घेतील,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केले.
बईचा महापौर हा महायुतीचाच होणार
मुंबईच्या महापौरपदावर बोलताना, अलीकडच्या काळात मुंबईचा महापौर कोण होणार? असं विचारलं जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगोदरच सांगितलेले आहे. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार. मुंबईचा महापौर हिंदू समाजातीलच होणार. सोबतच मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होणार, असे जाहीरपणे सांगून टाकले.
मुंबई आमच्या हातात द्या, आम्ही…
परवा एमआयएमचे पारीस पठाण बोलून गेले की मुंबईमध्ये बुरखेवाली मेअर होणार. मला वाटलं की मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील. पण मला समजलंच नाही की भोंग्याचे सेल अचानक डाऊन झाले. सकाळचा भोंगाही बोलेना, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच त्यांच्यातला कोणीही बोलायला तयार नाही. म्हणूनच आता छोती ठोकून सांगतो की महापौर हा मराठी आणि हिंदूच बनेल, असेही ते म्हणाले. आम्ही फक्त बोलणारे नाही. काही लोक फक्त काम केल्याचे बोर्ड लावतात. परंतु आमच्या कामाची स्मारकं मात्र मुंबईत दिसतात, असे म्हणत त्यांनी मुंबईकरांनी पालिका आमच्या हातात द्यावी. आम्ही पारदर्शी काम करून मुंबईचा चेहरा बदलून दाखवू, असे आवाहन केले.
