
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचा काल निकाल लागला आणि काही जागा वगळता सर्व्तर भाजपाच्या विजयाचे कमळ फुललेलं दिसलं. सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आणि भाजप-सेनेच्या युतीचाच मुंबईत महापौर दिसणार हे चित्र स्पष्ट झाले. महापालिकतील ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने अखेर विजयी पताका फडकावली. या सर्व निकालांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशात प्रतिष्ठेच्या बनलेल्या भाजप-शिदेंची सत्ता दिसते आहे. ठाकरेंना मुंबई टिकवता आली नाहीय याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊत थेट बोलले. ” आमच्या हातामध्ये सत्ता आणि एवढा पैसा असता, तर भाजपलासुद्धा देश टिकवता येणार नाही. फडणवीसांना मुख्यमंत्री पद टिकवता येणार नाही. आणि एकनाथ शिंदेनां त्यांचं जे पद आहे ना, ते टिकवता येणार नाही ” अशा शब्दांत राऊतांनी सुनावलं.
तर भाजपच्या 100 पिढ्या उतरूनही मुंबईवर त्यांचा झेंडा फडकला नसता
रवी राणा यांचा थेट मोठा गेम, अखेर..
Maharashtra Municipal Election Results 2026 : राज ठाकरे यांचे मनसे सैनिकांना मोठा आवाहन, थेट म्हणाले...
Mumbai Election Result 2026 : मुंबईतील विजयी उमेदवार घेणार एकनाथ शिंदे यांची भेट
Raj Thackeray On Mumbai Election Result 2026 : मनसे-उद्धव ठाकरे शिवसेना युती तुटणार का? निकालानंतर राज ठाकरेंचे पहिले संकेत काय?
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
शिवसेनेचे विद्यमान 60 नगरसेवक फोडले, त्यातलवे 90 टक्के पराभूत झाले. आम्हाला दोघांना (शिवसेना ठाकरे गट- मनसे) मिळून 71 जागाांवर विजय मिळाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला, त्यामुळे हे सगळे प्रश्न निरर्थक आहेत. सत्ता नाही पण एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भाजपचा, महाराष्ट्र्द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. शनिवार वाड्यावर इंग्रजाचा झेंडा फडकवणाऱ्यांच्या या औलादी आहेत अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
फडणवीस भांडण लावतायत
निकालानंतर राज ठाकरे यांनी केलेलं ट्विट, निवडणुकीआधी फडणवीस यांनी राज ठाकरे हे सर्वात मोठे लूजर ठरतील केलेलं हे विधान आणि हव्या असलेल्या ठिकाणी, योग्य जागा न मिळाल्यामुळेच मनसेचा पराभव झाला ही मनसेैनिकांनी केलेली तक्रार यावरूनही राऊतांना प्रश्न विचारण्यात आला.
मुळात हा पराभव आहे असं आम्ही मानत नाही, आम्ही चांगली लढत दिली, आघाडी घेतली. मनसेला आणखी 10-12 जागा मिळणं अपेक्षित होतं. त्यांचे काही उमेदवार अगीद थोड्या फरकाने पराभत झाले. पण मनसेचे उमेदवार जिंकून यावेत यासाठी आम्ही सर्वांनी, शिवसैनिकांनी शर्थ केली. बैठका घेतल्या, सर्व प्रकारची मतद केली, लोकांना आवहन केलं पण दुर्दैवाने मनसेचे उमेदवार कमी आले. त्यावर आम्ही एकत्र बसून चर्चा करू असं राऊत म्हणाले.
ठाकरेंच्या युतीत सर्वधिक फायदा उद्धव ठाकरेंना झाला, राज ठाकरेंना फार फायदा झाला नाही. फडणवीस देखील राज ठाकरेंबद्दल बोलले होते. त्यावर राऊतांनी थेट टीका केली. फडणवीस भांडणं लावतात असं ते म्हणाले. शिवसेना हा मुंबईतला मूळ पक्ष आहे, शिवसेनेची ताकदच आधीच्या महापालिकेत 84 ची होती, आता आम्हीसुद्धा कमी झालो ना. राज ठाकरेंच्या पक्षाला 6 जागा मिळाल्या, ते 20 पर्यंत मजल मारतील अशी अपेक्षा होती, पण निवडणुकांमध्ये पुढे मागे होतच असतंठाण्यात भाजपची ताकद मोठी होती असं म्हणतात, पण तिथेही शिंदे आले ना. असंअनेकदा होतं ना, असंही राऊतांनी सुनावलं.