AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा शब्द आहे तुम्हाला… ठाकरे कुटुंबातील नेक्स्ट जनरेशनची पहिली प्रतिक्रिया; पोस्ट होतेय तुफान व्हायरल

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात भाजपचे वर्चस्व स्पष्ट दिसत आहे. ठाकरे बंधूंना अपेक्षित यश मिळाले नाही, तर मनसेला मोठा पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पराभवाचे विश्लेषण केले, तर त्यांचे पुत्र अमित ठाकरेंनी 'मराठी माणसासाठी लढत राहू' असे आश्वासन देत, त्यांचे नाते केवळ मतांपुरते नसल्याचे सांगितले.

माझा शब्द आहे तुम्हाला... ठाकरे कुटुंबातील नेक्स्ट जनरेशनची पहिली प्रतिक्रिया; पोस्ट होतेय तुफान व्हायरल
महापालिका निवडणुकानंतर ठाकरे कुटुंबातील नेक्सट जनरेशनची पहिली प्रतिक्रिया समोर
| Updated on: Jan 17, 2026 | 11:21 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांचा निकाल जाहीर झाला असून बहुतांश जागांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व दिसत आहे. तर 20 वर्षांनी एकत्र येत युती केलेल्या ठाकरे बंधूंचा करिश्मा फारसा चाललेला नसून ठाकरेंना बीएमसी देखील गमावावी लागली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेची स्थिती तर राज्यात खूपच वाईटच असून बीएमसी निवडणुकीत त्यांचे दहापेक्षाही कमी उमेदवार निवडून आलेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अव्घे 6 उमेदवार विजयी झाले असून इतर महापालिकांमध्येही राज ठाकरेंचा पक्षा फारसा करिश्मा दाखवू शकलेला नाही.

याच निकालाच्या, पराभवाच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहीत काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच असं म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टची खूप चर्चा होत आहेच.

माच्र त्यानंतर आणखी काही वेळाने राज यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आहे. माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटनापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील ! असं म्हणत अमित ठाकरेंनी, ‘ मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही असा शब्दच दिला आहे. राज ठाकरे यांच्या पोस्टनंतर आता ठाकरे कुटुंबातील या नेक्स्ट जनरेशनचीही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

काय म्हणाले अमित ठाकरे ?

अमित ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी –

मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील !

निकाल काहीही असो… खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटनापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.

तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा !

जय महाराष्ट्र

अमित ठाकरे

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...