AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजप, शिवसेना आमने-सामने; स्वतंत्र लढण्याची ताकद ठेवा, शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने राजकारण तापलं

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. एकनाथ शिंदे हे शनिवारीच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. नेत्यानं मोठं विधान केलं आहे.

मोठी बातमी! भाजप, शिवसेना आमने-सामने; स्वतंत्र लढण्याची ताकद ठेवा, शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने राजकारण तापलं
Eknath Shinde, Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 24, 2026 | 4:51 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे,  जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार  किशोर पाटील जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर ठाम आहेत. जागेचा तिढा सुटत नसेल तर या जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत लढण्याचं आवाहानही  किशोर पाटील यांनी केलं आहे.  भारतीय जनता पक्षाची आज जागा दिसत असली तरी वाणी साहेबांच्या रूपाने ही जागा शिवसेनेचीच होती. जळगावमध्ये आज आमचे पालकमंत्री आहेत पाच आमदार आहेत. भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात आमचा मोठा भाऊ आहे. दोघेही लोकसभेचे सदस्य भापजचे आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विना शर्त आमच्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केलं आहे, त्यामुळे आता  आम्ही जर विधान परिषदेची जागा मागत आहोत तर भाजपने एक पाऊल मागे जात ही जागा आम्हाला सोडावी, अशी मागणी यावेळी किशोर पाटील यांनी केली आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आमदार गुलाबराव पाटील यांना देखील टोला लगावला आहे. जळगाव विधान परिषदेसाठी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी गुलाबराव पाटील हे आग्रही आहेत, या पार्श्वभूमीवर त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना किशोर पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. प्रतापराव पाटलांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी गुलाबराव पाटलांचे देखील अभिनंदन करेल. गुलाबराव पाटलांनी उमेदवार जाहीर करण्यापेक्षा आधी जळगावची जागा पदरात पाडावी. अजून जागा मिळाली नाही आणि आम्ही उमेदवार जाहीर करतो, असं यावेळी किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उमेदवार जाहीर करायचा असेल तर स्वतंत्र लढण्याची ताकद ठेवा. आम्ही आपल्या सोबत आहोत, असं म्हणत यावेळी किशोर पाटील यांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तर दुसरीकडे भाजप देखील या जागेसाठी आग्रही असल्यामुळे आता ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, की या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ