AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा वाद पेटला; शेवाळे, दरेकरांमध्ये जुंपली, दावे, प्रतिदावे काय?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.  बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा वाद चांगलाच पेटला आहे.  बॉस्किंग फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून भाजप नेते प्रवीण दरेकर आणि  शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे आमने-सामने आले आहेत.

बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा वाद पेटला; शेवाळे, दरेकरांमध्ये जुंपली, दावे, प्रतिदावे काय?
Darekar, ShewaleImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Apr 02, 2026 | 8:21 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.  बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा वाद चांगलाच पेटला आहे.  बॉस्किंग फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून भाजप नेते प्रवीण दरेकर आणि  शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. यावरून प्रवीण दरेकर यांनी राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  राहूल शेवाळेंना सांगितलं की हा विषय नीट पाहून घ्यावा. कुठलीही निवडणूक अशीच होत नाही.  एखादी निवडणूक झाली की ती पुन्हा होत का? तर होत नाही. चोराच्या ऊलट्या बोंबा आहेत. आम्ही काही लपवून छपून निवडणूक लढलो नाही. नितीन गडकरी यांना सगळी माहिती देऊ, त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे.  ही सगळी नुरा कुस्ती सुरू आहे. राहूल शेवाळेंना राज्यसभा खासदारकी मिळाली नाही म्हणून ते बीएफआयच्या माध्यमातून दिल्ली गाठायचा प्रयत्न करत आहेत, असं यावेळी दरेकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले दरेकर? 

चोराच्या ऊलट्या बोंबा आहेत. आम्ही काही लपवून छपून निवडणूक लढलो नाही. ही सगळी नुरा कुस्ती सुरू आहे. राहूल शेवाळेंना राज्यसभा खासदारकी मिळाली नाही म्हणून ते बीएफआयच्या माध्यमातून दिल्ली गाठायचा प्रयत्न करत आहेत. शेवाळेंना बॉक्सिंगमधील काय समजतं ?  शेवाळे यांच्या निवडीचा प्रकार कायदा गुंडाळून झाला. कोर्टाने निकाल दिल्यानंतर रडीचा डाव सुरू आहे. निवडणूक चॅरीटी कमिशनने घेतली. बीएफआय आणि जय कवळी यांच्यातील प्रकरण प्रलंबित आहे, असं यावेळी दरेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे राहुल शेवाळे यांनी देखील प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना प्रत्युत्त दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल शेवाळे?

प्रवीण दरेकरांनाच अभ्यास करण्याची गरज आहे. मला बॉक्सिंगमधलं काय कळतंय असं दरेकर म्हणाले, पण माझा मुलगा बॉक्सर आहे. दरेकरांनी माझ्या राजकीय भवितव्याची काळजी करू नये.  मी राजकीय मार्गानेच दिल्लीला जाईन. दरेकरांना एवढंच सांगायचं आहे की त्यांची संघटना वेगळी आहे, आमची संघटना वेगळी आहे. त्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही सगळ्या कायदेशीर बाबींची पुर्तता केलीये,  दुर्दैवाने त्यांनी जे विधान केलं ते योग्य नाही. आम्ही घटनात्मक बाजूने सक्षम आहोत असं  शेवाळे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...